येत्या सोमवारी शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश होईल; शिंदेगटाच्या नेत्याचा मोठा दावा
Sanjay Shirsat Press conference in Chhatrapati Sambhajinagar : या नालायकांमुळे आम्ही शिवसेना सोडली!; संजय राऊतांवर कुणी टीकास्त्र डागलं? मोठा पक्ष प्रवेश होणार असल्याचा दावा शिंदे गटाच्या नेत्याने केला आहे. हा बडा नेता कोण? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.
दत्ता कानवटे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 16 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून मोठा दावा करण्यात आला आहे. बडा नेता पक्षात येणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. येत्या सोमवारी मोठा पक्षप्रवेश होईल. ठाकरे गटामध्ये अनेक पक्षप्रवेश होत आहेत. काल आलेले लोक नेते अधिक होत आहेत. त्यामुळे कुठेतरी शिवसैनिकांमध्ये असंतोष वाढतो आहे. हेच कारण आहे. आता सोमवारी आमच्या शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश होणार आहे, असं शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हा बडा नेता नेमका कोण असेल? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
ठाकरे गटाला टोला
छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेनाच निवडणूक लढवेल आणि जिंकेल सुद्धा… छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचे चार उमदेवार इच्छुक आहेत. उद्याच्या सभेत शिवसेनेकडे ही कामे असतील. संजय राऊतकडे रांगोळी काढण्याचे कार्यक्रम आहेत. एका महिला कार्यकर्त्यांकडे हसण्याचे काम असेल. देशात मोदींची सत्ता आणण्यासाठी आम्ही एकमेकांचे काम करणार आहोत. विरोधी पक्षनेता असल्यामुळे एवढं तर बोलण्याचा त्यांना आधिकार आहे, असं म्हणत शिरसाट यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे.
संजय राऊतांवर निशाणा
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या मुंबईमध्ये आहे. त्यांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले आहेत. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी देखील स्वागताचे बॅनर लावले आहेत. त्यावर शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत असे बॅनर लावतो…हा बाळासाहेंबांचा कडवट शिवसैनिक? उद्धव ठाकरेंना नेता म्हणतच नाही. या नालायकांमुळे आम्ही शिवसेना सोडली आहे. आता राहुल गांधी यांचा नेता आहे. यांनी राहुल गांधीला आनंद दिघे समोर नतमस्तक व्हायला लावावं. हे आमचा स्वाभिमान आहे, असं म्हणत शिरसाटांनी राऊतांवर घणाघात केलाय.
सोमवारी उमेदवारींची यादी जाहीर केली जाईल. उद्धव ठाकरे यांच्याकडून चंद्रकांत खैरे हाच उमेदवार असतील. खैरेंनी शिवसेनेचे काम केले आहे. म्हणुन त्यांचा नंबर लागला असेल किंवा त्यांना कुणाला मोठे होऊ द्यायचे नसेल म्हणून त्यांना उमेदवारी देणार असतील, असंही संजय शिरसाट म्हणालेत.