भाजपचा खांदा वापरुन शिंदे गटाच्या प्रवक्त्याची ‘शिकार’? ठाकरे गटाची संजय शिरसाट यांच्याविरोधात मोठी खेळी, हा उमेदवार मैदानात

Sanjay Shirsat Western Assembly Constituency : एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्ते संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाने मोठी खेळी खेळली आहे. भाजपमधून आणलेल्या नेत्याला आगामी विधानसभेसाठी उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता चुरशीचा सामना रंगण्याची शक्यता आहे.

भाजपचा खांदा वापरुन शिंदे गटाच्या प्रवक्त्याची 'शिकार'? ठाकरे गटाची संजय शिरसाट यांच्याविरोधात मोठी खेळी, हा उमेदवार मैदानात
पश्चिम विधानसभा मतदारसंघात लवकरच धुमश्चक्री
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 10:51 AM

छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे गटाने मोठी खेळी खेळली आहे. या मतदारसंघाचे सध्याचे आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात व्हाया भाजपमधून आलेल्या नेत्याची वर्णी लागली आहे. शिरसाट हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. त्यांच्याविरोधात भाजपमधील उमेदवाराला आपल्याकडे वळवत महायुतीला मोठा धक्का देण्याचा महाविकास आघाडीचा डाव कितपत यशस्वी होतो, हे येत्या विधानसभेला समोर येईलच.

राजू शिंदे यांची केली निवड

छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या प्रमुख पदी राजू शिंदे यांची निवड केली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला. राजू शिंदे यांच्या निवडीनंतर संजय शिरसाट यांचा विरोधातला उमेदवार निश्चित झाल्याचे मानण्यात येत आहे. या मतदारसंघातून राजू शिंदे इच्छुक होते. पण महायुती धर्मामुळे त्यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची खात्री नव्हती. त्यामुळे त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. राजू शिंदे यांना पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गट तिकीट देण्याची शक्यता आहे. पश्चिम विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरे ही इच्छुक असल्याचे समजते. राजू शिंदे विधानसभा प्रमुख पदी नेमल्यामुळे विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.

हे सुद्धा वाचा

एक महिन्यापूर्वी केला प्रवेश

राजू शिंदे हे भाजपचे जिल्ह्यातील मोठे नेते आहेत. ते माजी महापौर पण आहेत. त्यांनी यापूर्वी पण विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी केली होती. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत फुटू पडून महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन खेमे तयार झाले. त्यामुळे भाजपच्या अनेक इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले. त्यानंतर जुलै महिन्यात राजू शिंदे यांनी 18 जणांसोबत भाजपला रामराम ठोकला आणि उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. त्याचवेळी ते संजय शिरसाट यांच्याविरोधात लढणार असल्याची चर्चा रंगली होती.

बालेकिल्ल्याची बांधणी घेतली हाती

महाविकास आघाडीने मराठवाड्यात लोकसभेला करिष्माई कामगिरी केली. छत्रपती संभाजीनगरचा अपवाद वगळता उद्धव ठाकरे गटाने आलेख उंचावला. लोकसभेला जनतेची सहानुभुतीचा फायदा झाला. त्याच इंधनावर विधानसभेला महायुतीला धक्का देण्याची कसरत महाविकास आघाडी करत आहे. तर उद्धव ठकरे शिवसेनेने मराठवाड्यात ढासळलेल्या राजधानीचा बालेकिल्ला बांधणी करायला घेतला आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.