अपात्रतेचा निकाल लागताच छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने, काय घडतंय?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर करताच छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले आहेत. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.

अपात्रतेचा निकाल लागताच छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने, काय घडतंय?
Follow us
| Updated on: Jan 10, 2024 | 8:32 PM

छत्रपती संभाजीनगर | 10 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. विधानसभा अध्यक्षांनी या निकालातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला सर्वात मोठा दिलासा दिला. राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचा पक्षच मूळ शिवसेना पक्ष असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांनी भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती योग्य ठरवली आहे. तसेच ठाकरे शिदेंची पक्षातून हकालपट्टी करु शकत नाहीत, असं म्हटलं आहे. ठाकरे उलट तपासणीला आले नाही त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी त्यांचं प्रतिज्ञापत्र अमान्य केलं आहे. तसेच राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे गटाचे सर्व आमदार पात्र ठरवले आहेत. या निकालानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गट आमनेसामने आले आहेत.

शिवसेना ही शिंदेंचीच असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाने आक्रोश मोर्चाला सुरुवात केली. आम्ही सदैव उद्धव ठाकरे यांच्यासोबत असा बॅनर घेऊन कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. या कार्यकर्त्याकंडून काळे झेंडे दाखवत विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचा निषेध व्यक्त केला गेला. तर समोरच्या बाजूने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात येतोय. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून जल्लोष व्यक्त केला जातोय. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी केली जातेय.

घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा

दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे. पण पोलिसांकडून सर्व काळजी घेतली जात आहे. पोलिसांकडून मध्यस्थी केली जात आहे. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना थांबवलं जात आहे. कोणताही गैरप्रकार घडू नये असे प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहे.

नेमकं काय घडलं?

आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल समोर आल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात जल्लोष सुरु होता. यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी आंदोलनास सुरुवात केली. यावेळी दोन्ही गट समोरासमोर आले. दोन्ही गट एकमेकांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करत होते. पण पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अडवलं. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.