आंबे का उचलले? औरंगाबादच्या बिबी का मकबऱ्यात पर्यटकांना बेदम मारहाण; पर्यटकांमध्ये भीती

औरंगाबादच्या प्रसिद्ध बिबी का मकबरा परिसरात चार पर्यटकांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सर्वांसमोरच आंबे कंत्राटदाराच्या माणसांनी या पर्यटकांना क्षुल्लक कारणावरून मारहाण केली आहे.

आंबे का उचलले? औरंगाबादच्या बिबी का मकबऱ्यात पर्यटकांना बेदम मारहाण; पर्यटकांमध्ये भीती
bibi ka maqbaraImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 8:41 AM

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये दररोज शेकडो पर्यटक बिबी का मकबरा पाहायला येतात. प्रति ताजमहल म्हणून बिबी का मकबरा प्रसिद्ध आहे. त्यामुळे ताजमहल बघायला जाता येत नाही म्हणून लोक बिबी का मकबरा पाहायला येतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे लोक येत असतात. मकबऱ्याची प्रत्येक भिंत न्यायहळत असतात. तसेच मकबऱ्याजवळ फोटोही काढत असतात. त्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मकबरा परिसर पर्यटकांनी नेहमीच गजबजलेला असतो. मात्र, काल मकबऱ्यात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. मकबऱ्यात काही पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. क्षुल्लक कारणावरून ही मारहाण करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

औरंगाबादच्या प्रसिद्ध मकबरा परिसरात पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. आंबे का उचलले? म्हणत मारहाण करण्यात आली आहे. आधी या पर्यटकांना बीबी का मकबऱ्यात आतमध्ये बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर परत बाहेर आणून या चार पर्यटकांना बेदम चोप देण्यात आला आहे. मकबरा परिसरातील आंब्याचे कंत्राट घेतलेल्या लोकांकडून ही मारहाण करण्यात आली आहे. आंब्याच्या कंत्राट घेणाऱ्या लोकांकडून पर्यटकांशी नेहमीच अरेरावी केली जात असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. या मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच या प्रकारावर पर्यटकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

हे सुद्धा वाचा

सुरक्षेची मागणी

मकबऱ्यातील आंब्याचे कंत्राट घेणाऱ्याच्या माणसांची दादागिरी वाढली आहे. आधी अरेरावी करणाऱ्यांची मजल आता मारहाणीपर्यंत गेली आहे. पर्यटकांवर हात उचलणे अत्यंत चुकीचं आहे. यावरून सर्वच पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे या आंब्याच्या कंत्राटदाराच्या माणसाला आवर घालण्यात यावा, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि इथे येणाऱ्या पर्यटकांना संरक्षण पुरवण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या कंत्राटदाराच्या माणसांना मकबरा परिसरातून हाकलून देण्याची मागणीही करण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी स्वत:हून लक्ष घालण्याची मागणीही पर्यटकांमधून होत आहे.

पर्यटनाला यायचे की नाही?

कालच्या प्रकारावर काही पर्यटकांनी तर संताप व्यक्त केला आहे. बिबी का मकबरा हे पर्यटन स्थळ आहे. पर्यटकांनी या स्थळाला भेट द्यावी म्हणून ते उघड करण्यात आलं आहे. कंत्राटदाराच्या आंब्याच्या सोयीचं बिबी का मकबरा हे केंद्र नाहीये. त्यामुळे या परिसरातून कंत्राटदाराला समज देऊन हुसकावून लावलं पाहिजे. अशा पद्धतीने जर पर्यटकांना मारहाण होत असेल तर आम्ही पर्यटनाला यायचे की नाही? असा सवाल पर्यटक करत आहेत.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.