ISIS : राज्यात इसिसने हातपाय पसरले? छत्रपती संभाजीनगरातील 50 तरुण इसिसच्या गळाला

ISIS Trap : मराठवाड्यातून एक मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील 50 जण इसिसच्या गळाला लागल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने याविषयीचा खुलासा केला आहे.

ISIS : राज्यात इसिसने हातपाय पसरले? छत्रपती संभाजीनगरातील 50 तरुण इसिसच्या गळाला
Mohammad Zoeb Khan ISIS Chhatrapati Sambhajinagar
Follow us
| Updated on: Jul 13, 2024 | 2:19 PM

धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली दहशतवाद पसरवणाऱ्या इसिस या संघटनेच्या संपर्कात शहरातील अनेक तरुण असल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या तपासात समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात एनआयएतर्फे छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल बेरीबाग येथील ३५ वर्षीय आयटी इंजिनिअर मोहम्मद झोएब खान याला अटक केली होती. मोहम्मद झोएब खान स्लीपर सेल म्हणून काम करत होता. इसिसचे जाळे छत्रपती संभाजीनगरमध्ये पसरवण्याचे काम त्याने केले. देशातील संवेदनशील ठिकाणी हल्ला करण्यासाठी तरुणांची मोठी टोळी तयार करण्यात आली होती.

पळून जाण्याचा प्लॅन

भारतामध्ये मोठ्या घातपात करून अफगाणिस्तान किंवा तुर्की येथे पळून जाण्याचा त्यांचा प्लान होता.त्याच्या विरुद्ध मुंबई एनआयएच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आला आहे. यातून छत्रपती संभाजीनगरमध्ये पसरलेल्या एनआयएच्या जाळ्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये एकच खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून प्रशिक्षण

मोहम्मद झोएब यानं वेगवगेळ्या भागातील 50 तरुणांना त्याच्या सोबत जोडले. त्यांचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला. या माध्यमातून विविध ठिकाण हल्ला करण्यासाठी स्फोटकांची निर्मिती करण्याचे प्रशिक्षण तो तरुणांना देत होता. आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी शहरात 9 ठिकाणी छापे टाकले. सर्व एजन्सींचे तपास कार्य अजून सुरु आहे.

अशी झाली कारवाई

राष्ट्रीय तपास यंत्रणेने पहिल्यांदा शहरात ही कारवाई केली होती. मोहम्मद झोएब हा बेंगळुरुमध्ये नोकरीला होता. त्यानंतर तो एका वर्षांपासून वर्कहोम करत होता. त्याच्या नेटवर्कवर एजन्सींचं लक्ष होते. त्याच्यावर पाळत ठेवल्यानंतर कारवाई करण्यात आली. त्याला छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल येथील बेरी बाग परिसरातून 15 फेब्रुवारी 2024 रोजी दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याविरोधात एनआयएने मुंबईतील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

स्लीपर सेल म्हणून करत होता काम

मोहम्मदकडे झोएब स्लीपर सेलचे काम होते. त्याचा नातेवाईक शोएबं खानने त्याला इसिसमध्ये दाखल करुन घेतले होते. तो लिबियातून इसिससाठी काम करत होता. तो आयटी इंजिनिअर आहे. मोहम्मद झोएबच्या मदतीने मराठवाड्यातील आणि राज्यातील 50 जणांची एक टोळी तयार करण्यात आली होती. विविध ठिकाणी हल्ला करण्यासाठी त्यांचा वापर करण्यात येत होता.

Non Stop LIVE Update
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...