AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Winner Candidate List : मराठवाड्याच्या राजधानीचा कौल कुणाला? लाडक्या बहीण ओवाळणार कुणाला? कुणाच्या विजयाचा गुलाल तुमच्या मतदारसंघात,एका क्लिकवर छत्रपती संभाजीनगरचा निकाल

Maharashatra Assembly Election Results 2024 : मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा हवा कुणाची हा प्रश्न कायम आहे. लोकसभेला महाविकास आघाडीने हाबाडा दिल्याने यावेळी महायुतीने मोठं प्लॅनिंग केलं होते. एक क्लिकवर तुम्ही विजयी उमेदवारांची यादी पाहु शकता..

Winner Candidate List : मराठवाड्याच्या राजधानीचा कौल कुणाला? लाडक्या बहीण ओवाळणार कुणाला? कुणाच्या विजयाचा गुलाल तुमच्या मतदारसंघात,एका क्लिकवर छत्रपती संभाजीनगरचा निकाल
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 3:00 PM

आज लोकशाहीचा उत्सव दिसून येईल. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात कुणाच्या पारड्यात विजयाचं माप पडतं हा चर्चेचा विषय होता. गेल्या काही वर्षांपासून एमआयएमने येथे चांगली पकड मिळवली. तर लोकसभेत शिंदे सेनेने येथे विजय मिळवला. आता कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या हे एका क्लिकवर पाहूयात…

लोकसभा निकालावेळी संपूर्ण मराठवाड्यात महायुतीचे आव्हान महाविकास आघाडीनं संपुष्टात आणलं. महाविकास आघाडीने महायुतीला मराठवाड्याता नाकेनऊ आणले. मराठा फॅक्टरने मराठवाड्यात मोठा उलटफेर केला. पण मनोज जरांगे यांच्याशी जवळीक असल्याचा फायदा खासदार संदीपान भुमरे यांना झाल्याचा दावा लोकसभेवेळी झाला. महायुतीत छत्रपती संभाजीनगरची एकमेवर सीट शिंदे सेनेकडे गेली. येथे भुमरे लोकसभेत गेले.

आता विधानसभेला छत्रपती संभाजीनगर शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात मोठी चुरस आहे. येथे औरंगाबाद पूर्व मतदारसंघात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि भाजपाचे अतुल सावे यांच्यात थेट सामना आहे. तर औरंगाबाद पश्चिम मध्ये शिंदे सेनेची तोफ संजय शिरसाट आणि भाजपामधून उद्धव सेनेत आलेले राजू शिंदे यांच्यात टफ फाईट होती. तर औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिंदे सेनेचे प्रदीप जैस्वाल आणि उद्धव सेनेचे डॉ. बाळासाहेब थोरात यांच्यात सामना होता.

हे सुद्धा वाचा
विधानसभा मतदारसंघविजयी उमेदवाराचे नावपक्ष
औरंगाबाद पूर्व
औरंगाबाद पश्चिम
औरंगाबाद मध्य
कन्नड
वैजापूर
गंगापूर
सिल्लोड
फुलंब्री
पैठण

जिल्ह्यातील इतर मतदार संघापैकी पैठणमध्ये शिंदे सेनेचे विलास भुमरे आणि उद्धव सेनेचे दत्ता गोर्डे यांच्यात टफ फाईट असेल. तर गंगापूरमध्ये भाजपचे प्रशांत बंब आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सतीश चव्हाण यांच्यात चुरस दिसले. वैजापूरमध्ये शिंदे गटाचे रमेश बोरनारे तर उद्धव सेनेचे डॉ. दिनेश परदेशी यांच्यात द्वंद दिसेल. कन्नडमध्ये संजना जाधव विरुद्ध उद्धव सेनेचे उदयसिंह राजपूत आणि अपक्ष हर्षवर्धन पवार असा तिरंगी सामना आहे. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार आणि उद्धव ठाकरे गटाकडून सुरेश बनकर हे आमने-सामने आहेत. तर फुलंब्रीत यावेळी भाजपाकडून अनुराधा चव्हाण आणि त्यांच्याविरोधात काँग्रेसचे विलास औताडे अशी टफ फाईट आहे.

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.