Aurangabad Central Constituency : चौरंगी लढतीत कोण साधेल सुवर्ण ‘मध्य’; औरंगाबाद मध्य मतदारसंघात मत विभाजनाचा पुन्हा MIM ला होणार फायदा? की पुरून उरेल सेना

Maharashatra Vidhansabha Election 2024 : औरंगाबाद 'मध्य'च्या माध्यमातून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन- MIM चा मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश झाला होता. त्यानंतर हैदराबाद येथील या पक्षाने राज्याच्या राजकारणात बरीच मजल मारली. आमदार आणि खासदारकीची कमाई केली. आता मध्य मतदारसंघात हा पक्ष चढाईच्या तयारीत आहे.

Aurangabad Central Constituency : चौरंगी लढतीत कोण साधेल सुवर्ण 'मध्य'; औरंगाबाद मध्य मतदारसंघात मत विभाजनाचा पुन्हा MIM ला होणार फायदा? की पुरून उरेल सेना
औरंगाबाद मध्य मध्ये मतविभाजानाचा फायदा कुणाला?
Follow us
| Updated on: Oct 26, 2024 | 2:34 PM

औरंगाबाद मध्य मतदार संघाने ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन- MIM साठी दरवाजे किलकिले केले. इम्तियाज जलील यांच्या माध्यमातून पहिला आमदार मिळाला, पहिला खासदार दिला. कधी काळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकारणाने अशी कूस बदलली की प्रस्थापित पक्षांचे धाबे दणाणले. त्यानंतर एमआयएमने दिन दुगणी, रात चौगुणी प्रगती साधली. महापालिकेपासून जवळपास सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाच्या सदस्यांची लक्षणीय संख्या दिसली. आज त्याच औरंगाबाद मध्य मतदारसंघात (Aurangabad Central Constituency) 2014 ची स्थिती दिसत आहे. या मतदारसंघात ट्रँगल तयार होताना दिसत आहे. दहा वर्षांपूर्वी मत विभाजनात एमआयएमचा आमदार पहिल्यांदा सुरूंग लावून निवडून येण्यात यशस्वी झाला होता. तशीच काहीशी आता परिस्थिती तयार झाली आहे.

मत विभाजनाचा एमआयएमला फायदा

2014 मधील विधानसभा निवडणुकीत एमआयएमला मत विभाजनाचा फायदा झाला. मुस्लीम आणि दलित मतांची मोट बांधत इम्तियाज जलील यांच्या सारख्या नवख्या पत्रकाराने या मतदारसंघात विजयश्री खेचून आणला होता. आता दहा वर्षानंतर ही तशीच परिस्थिती तयार होत आहे. या राजकीय कुरूक्षेत्रात शिवसेनेच्या शिंदे सेनेने प्रदीप जैस्वाल यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर उद्धव सेनेने किशनचंद तनवाणी यांचे नाव जाहीर केले. महाविकास आघाडीत प्रवेश मिळेल, या आशेवर एमआयएम होती. पण त्यांना कोणताही निरोप आला नाही. त्यानंतर एमआयएमने नासिर सिद्दिकी यांना पुन्हा या मतदारसंघातून उतरवले. 2019 मध्ये सिद्दिकी यांनी दुसऱ्या क्रमांकावर धडक दिली होती. त्यामुळे दोन सेनेतील मत विभाजनाचा एमआयएमला मोठा फायदा होईल असा अंदाज बांधण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

मतांचे गणित काय?

औरंगाबाद मध्य मतदारसंघात एकूण 3 लाख 66 हजार 435 मतदार आहेत. या मतदारसंघात हिंदू मतदान 45 टक्क्यांच्या घरात आहे. तर मुस्लीम मतदार हे 38 टक्के इतके आहेत. दलित समाजाचा मतांचा आकडा 15 टक्क्यांच्या घरात जातो. तर इतर 3 टक्क्यांच्या घरात मतदार आहेत. मागील निवडणुकीत अखंड शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना 42 टक्के मतदान झाले होते. तर एमआयएमचे नासेर सिद्दीकी यांना 35 टक्के मत मिळाली होती. वंचितचे उमेदवार अमित भुईगळ यांना 14 टक्के मतं मिळाली होती.

यावेळी भाजप-शिंदे सेना आणि उद्धव सेना असे दोन उमेदवार मैदानात आहेत. तर एमआयएमच्या पाठीमागे दलित मते किती आहेत, हे निकालानंतर समोर येईल. तर वंचितने मध्य विधानसभा मतदारसंघासाठी मोहम्मद जावेद मोहम्मद इसहाक यांच्या नावाची घोषणा केली आहे. इतरही अनेक मुस्लीम उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे एमआयएमची मतं फुटण्याची पण चर्चा आहे. अर्थात विस्तृत चित्र पाहता सेनेच्या दोन्ही उमेदवारांना या मतदारसंघात नेटाने लढाई करावी लागणार हे स्पष्टच आहे.

मग इम्तियाज जलील लढणार कोठून?

माजी खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज खरेदी केले आहे. तर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतही ते नशीब आजमावणार आहेत. आता नासेर सिद्दिकी यांना मध्य मधून उमेदवारी दिल्याने जलील यांच्यासमोर औरंगाबाद पूर्व आणि वैजापूर हे मतदारसंघ उरले आहेत.

Non Stop LIVE Update
थोरात आणि विखे समर्थकांच्या संगमनेरमधील राड्याची केंद्राकडून दखल
थोरात आणि विखे समर्थकांच्या संगमनेरमधील राड्याची केंद्राकडून दखल.
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्यं अतिशय किळसवाणं - रोहित पाटील
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्यं अतिशय किळसवाणं - रोहित पाटील.
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल, गुन्हा दाखल
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल, गुन्हा दाखल.
'महिलांचा मानसन्मान न राखणाऱ्यांना...,'काय म्हणाल्या जयश्री थोरात
'महिलांचा मानसन्मान न राखणाऱ्यांना...,'काय म्हणाल्या जयश्री थोरात.
कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, कुणाला संधी-कुणाचा पत्ता कट ?
कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, कुणाला संधी-कुणाचा पत्ता कट ?.
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?.
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा.
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा.
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'.