आता नेत्यांना गावात राहण्यासही बंदी?; मनोज जरांगे पाटील यांचा नेमका इशारा काय?

एकी वाढवा. उद्रेक करू नका. शांततेचं ब्रह्मास्त्र मोठं आहे. डेंजर आहे. 70 वर्षात जे दिलं नव्हतं ते आता द्यायला लागले. त्यांचं दिल्ली-मुंबई सुरू आहे. मीही त्यांना भेटत नाही. त्यांना वाटतं मी फुटेल. आपल्याकडे बॅगा चालत नाही. पदं चालत नाही. माझ्याकडे काहीच नाही. आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही. गावागावात जागे राहा. 1 डिसेंबर नंतर मराठवाड्यातील प्रत्येक गावात साखळी उपोषण झालं पाहिजे. एकही गाव तसं राहता कामा नये.

आता नेत्यांना गावात राहण्यासही बंदी?; मनोज जरांगे पाटील यांचा नेमका इशारा काय?
Follow us
| Updated on: Nov 12, 2023 | 1:40 PM

जालना | 12 नोव्हेंबर 2023 : भोकरदन तालुक्यात मराठा समाजाचं बोर्ड तोडण्यात आल्याने मनोज जरांगे पाटील प्रचंड आक्रमक झाले आहेत. बोर्ड तोडणाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. तसेच कारवाई न केल्यास आम्हाला काय करायचं ते बघून घेऊ, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी करण्यात आली होती. आता गावात राहण्यास बंदीही केली जाण्याची शक्यता आहे. तसे संकेतच मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहेत.

संभाजीनगर येथील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील जालन्यातील चित्तेगाव येथे आले होते. यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. त्यानंतर त्यांनी गाडीच्या टपावर उभं राहूनच लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा समाजाला एकजूटीचं आवाहन केलं.

24 तारखेपर्यंत आपली कसोटी आहे. झोपू नका, जागृत राहा. एकजूट कायम ठेवा. 24 तारखेपर्यंत ज्यांना गावात यायचं येऊ द्या. त्यांना गावात हिंडू फिरू द्या. पण त्यांचा पाहुणचार करू नका. खाऊपिऊ घालू नका. 24 तारखेनंतर आपण निर्णय घेऊ. त्यानंतर त्यांनी दुसरीकडे खोल्या करून राहावं लागेल. गावात राहायचं असेल तर मग आम्हाला आरक्षण द्या, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

गाव मराठ्यांचं आहे, येऊनच दाखव

यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांवर नाव न घेता जोरदार टीका केली. त्यांच्या मुलांना आपण सुधरवलं. आता आपल्या सुधरावा. त्यांची मुलं आता आपल्यावरच दांडकं घेऊन येत आहेत. गावात बोर्ड लावल्यामुळे ते म्हणतात, बोर्ड कशाला लावला? गाव काय तुमच्या बापाचं आहे का? असा सवाल करतानाच भोकरदनमध्ये कुणी तरी बोर्ड तोडलं. आता सुरुवात तुम्ही केली. आता बोर्डाला हात लावूनच दाखवा. हे गाव मराठ्याचं आहे. आता गावात येऊनच दाखवा, असा इशाराच त्यांनी दिला. तुला गावात यायचं तर आरक्षण घेऊन ये. आम्ही तुझी मिरवणूक काढू, असंही ते म्हणाले.

तुमची चड्डीही राहणार नाही

24 तारखेपर्यंत आपण नेत्यांची गावात प्रवेश करण्यास मज्जाव करणारी बंदी उठवली आहे. गावात यायचं तर या. पण बोर्डाला हात लावायचा नाही. आम्ही आमच्या लेकरांसाठी बोर्ड लावला. आमच्या पोरांना आरक्षण देण्यासाठी बोर्ड लावलाय. तुला गाडी, बंगले, दिले. आमदार, खासदार केलं. मंत्री केलं. तूच आमचे बोर्ड फाडतोस? मराठे बोर्ड फाडायला लागले तर तुमची चड्डीही राहणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

हे आहे तरी किती?

भोकरदनला जो प्रकार झाला तो अत्यंत चुकीचा आहे. सरकारला इथूनच सांगतो, आरोपींना अटक करा. त्यांच्यावर कारवाई करा. नाही तर यापुढे बोर्ड फोडले तर मग आम्ही बघून घेऊ. हे आहे तरी किती? हे अल्पसंख्याक आहेत. आमच्या नादी लागू नका. आमच्या गोरगरिबांचा प्रश्न आहे, असं त्यांनी सांगितलं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.