AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुंड थोडेच संप्रदाय चालवतात, आता जरांगे उतरले मैदानात, धनंजय मुंडेंच्या क्लीनचिटवर सणसणीत टोला

Manoj Jarange reacts to Dhananjay Munde clean chit : भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्या वादात उडी घेतल्याने एकच गोंधळ उडाला आहे. मुंडे यांना टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर आता जरांगे यांनी असा सणसणीत टोला लगावला आहे.

गुंड थोडेच संप्रदाय चालवतात, आता जरांगे उतरले मैदानात, धनंजय मुंडेंच्या क्लीनचिटवर सणसणीत टोला
मनोज जरांगे पाटील, धनंजय मुंडे, नामदेव महाराज शास्त्री
Follow us
| Updated on: Jan 31, 2025 | 12:22 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडच नाही तर राज्याचे राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वादात उडी घेतल्याने एकच गोंधळ उडाला आहे. मुंडे यांना टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर आता जरांगे यांनी असा सणसणीत टोला लगावला आहे.

काय म्हणाले मंहत?

“धनंजय मुंडे गडावर आल्यावर त्यांची मानसिकता जाणून घेतली. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवले जात आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप झाल्याने संप्रदयाचे नुकसान आहे. भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे. ज्यांनी गुन्हा केला त्यांची मानसिकता तशी का झाली याची मीडिया दखल का घेतली नाही? मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही, असे भगवंतगडाचे महंत नामदेव शास्त्री म्हणाले.

हे सुद्धा वाचा

त्यांना दोष देणार नाही

महंत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संतोष देशमुख यांच्या सर्व मारेकऱ्याना शिक्षा व्हायला हवी. ते एक मोठे महंत आहेत. राजकीय लोक डागळेलेले असतात. मात्र मला वाटत नाही ते बोलले असतील. त्यांना दोष देऊन जमणार नाही. जाणारे त्यांना शिकवत असतील की, असे बोला तसे बोला.त्यांना दोष देण्या पेक्षा जो गेला,तो जे करतो तो काही ऐकायला तयार नाही. विकृत पणाने केलेले कार्य याला समाज पाठीशी घालत नाही.समाजात प्रचंड उद्रेकाची लाट तयार झाली तर समाज पाठीशी घालणार नाही, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी मांडले.

गुंड संपद्राय चालवतात का?

गुंड थोडेच संप्रादाय चालवतात ? गुंडाचे सहारे घेऊन संप्रदाय चालवतील असं वाटत नाही.हे शिकवले असा संशय येतो. महाराज वेगळे आहेत. बोलण्याच्या ओघात ते बोलून गेले असतील तर दुरुस्त करतील. एक बाजू सांगितली तर पटत असते. फास लागायला लागला तर आसे होऊ शकते, असे जरांगे म्हणाले.

मला वाटत नाही त्यांच्यावर दबाव असेल, जे आहे ते रोखठोक आहे. जे आहे ते सडेतोड आहे. देशमुख यांची घटना मोठी त्याला गड पाठीशी घालू शकत नाही. गफलत असेल, राज्याचे मोठे दुर्दैव आहे. शेवटी महंत महंत आहेत. बाबाजी (नामदेव शास्त्री ) कडू शब्द गेले असतील राज्याची मोठी हानी आहे. खून केल्याचा आनंद आहे का? खून केलेल्यांना सोडून द्या असा अर्थ होतो का ? काय शिकावे शिकवणार्‍याने, बाबाजी (नामदेव शास्त्री ) ला दोष देऊन काय उपयोग ? तुम्ही माणूस मारून टाकला,माणसाच्या रक्ताची दया मया नाही का? असा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.

संतोष देशमुख यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे आहे. पूर्वीचे दुख देणारे हेच का ? हीच का ती टोळी ? बाबा (नामदेव शास्त्री ) यांना ही यात ओढतच आहे ? धनंजय मुंडे कोणता सलोखा ठेवत आहेत ? बाबाजी (नामदेव शास्त्री ) यांना दोष नाही. न्यायची अपेक्षा न करणे फक्त गुंड सांभाळणे. त्यांची सर या गुंडाला नाही येणार, बलात्कार, खून असे करून स्वत:च्या जातीचे लोकांचे खून केले. पाप यांनी केलं मात्र बाबाजी (नामदेव शास्त्री )यांना पांघरून टाकायला लावलं का? बाबाजी (नामदेव शास्त्री ) जवळ जावून पाप लपवू नये, अशी खरमरीत टीका जरांगे पाटील यांनी केली.

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...