Sharad Pawar | गुप्त बैठकीत काय-काय चर्चा झाली? शरद पवार अखेर बोलले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अखेर अजित पवार यांच्यासोबतच्या गुप्त बैठकीवर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्यासोबतची गुप्त बैठक नेमकी का घडून आली आणि या बैठकीत काय चर्चा झाली, याबाबतची माहिती शरद पवार यांनी दिली.

Sharad Pawar | गुप्त बैठकीत काय-काय चर्चा झाली? शरद पवार अखेर बोलले
Sharad pawar-Ajit pawar
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 5:44 PM

औरंगाबाद | 16 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काही दिवसांपूर्वी पुण्यात गुप्त बैठक झाली होती. या बैठकीवर अजित पवार यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आज शरद पवार यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिलीय. ही बैठक नेमकी का घडून आली? याबाबत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या भेटीमुळे विरोधी पक्षांमध्ये सुरु असलेल्या घडामोडींबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे गुप्त बैठकीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी चांगलीच शाब्दिक फटकेबाजी केली.

शरद पवार यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी अजित पवार यांच्यासोबतच्या गुप्त बैठकीत केंद्रीय मंत्रिपदाबाबतच्या काही ऑफर आल्याच्या चर्चांवर प्रश्न विचारला. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी याबाबत केलेल्या एका मोठ्या दाव्याबाबतही यावेळी शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. “माजी मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं ते मला माहिती नाही, पण ती जी गुप्त बैठक होती त्यामध्ये अशा काही गोष्टीची चर्चा झाली नाही. ही गोष्ट मी जाहीरपणे सांगितली”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

शरद पवार गुप्त बैठकीवर नेमकं काय म्हणाले?

“भेट झाली नाही, असं नाही. मला भेटायला आले. पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी कुठलाही कुटुंबिक प्रश्न असेल तर…, म्हणजे माझ्या कुटुंबात एक पद्धत आहे, माझा एक सल्ला घ्यायचा. त्यासाठी कुणी आलं असेल तर त्यावर अधिक काही समजयाचं कारण नाही”, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

शरद पवार यांची मिश्किल प्रतिक्रिया

“अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर मी माध्यमांच्या समोरुन गेलो. माझी काच (गाडीची काच) खाली होती. मी फुलं स्वीकारली. तुम्ही बघितलं होतं का? मला तिथे फुलं दिली. मी फुलं घेतली मग निघालो”, अशी मिश्किल प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिरी. “मी माझ्यापुरता सांगू शकतो. इतर लोकांबद्दल सांगू शकत नाही”, असंही ते यावेळी म्हणाले. “राज ठाकरे यांनी काही दावा केला असेल तर त्यांना विचारा. मी त्यांचा प्रवक्ता नाही”, अशा शब्दांत शरद पवार यांनी उत्तर दिलं.

शरद पवारांची ईडीवर टीका

“आमचे काही सहकारी गेले. त्यापैकी काही लोक मला भेटले आणि त्यांनी एक नवीन माहिती दिली, या देशामध्ये राजकीय निर्णय राजकीय पक्ष, राजकीय नेते घेतात, असं मला वाटत होतं. पण माझे काही सहकारी त्यांचा निर्णय घेण्याआधी मला भेटले होते. त्यांच्याकडून मला एक नवीन कळलं की, राजकीय पक्ष किंवा राजकीय नेते निर्णय घेतात त्याहीपेक्षा एक पवनशक्ती, जिच्यामध्ये ईडी आहे. ती ईडी हे निर्णय घेतात, असं आता दिसायला लागलं आहे. त्यांनी कुणाच्या बाबतीत कधी निर्णय घेतले असं मला माहिती नाही”, अशी टीका शरद पवारांनी केली.

काँग्रेस-ठाकरे गट वेगळी तयारी करणार?

अजित पवार यांच्यासोबतच्या गुप्त भेटीनंतर काँग्रेस-ठाकरे गट वेगळी तयारी करायला लागल्याची चर्चा आहे, याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी अशी चर्चा आहे, पण वस्तुस्थिती नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. “आम्ही राजकीय चर्चाच केली नाही. माझ्याशी कोण चर्चा करणार? ज्या पक्षात हे सगळे लोक होते त्या पक्षाचा प्रमुख कोण आहे, वरिष्ठ नेता कोण नाही, त्यामुळे या गोष्टींना काही महत्त्वाचं कारण नाही”, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांची पुण्याच्या लोकमान्य टिळक पुरस्कारावर प्रतिक्रिया

“जो कार्यक्रम सहा महिन्यांपूर्वी ठरला होता, लोकमान्य टिळक यांच्या कार्यक्रमाला विश्वस्तांमध्ये सुशीलकुमार शिंदे आहेत. ते कुठल्या पक्षाचे आहेत ते सर्वांना माहिती आहे. हा कार्यक्रम आयोजित करणारे गृहस्थ मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांच्याबद्दल चर्चा होत नाही. पण माझ्याबाबत चर्चा झाली. नाव त्यांनी सूचवलं विनंती केली की, तुम्ही विचारा. मी फोन केला आणि त्यांनी निमंत्रण स्वीकारलं”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.