खासगी कोचिंग क्लासेस म्हणजे अभ्यासक्रमाच्या सीट विकण्याची लिलावगृहे नाहीत; ग्राहक आयोगाने क्लासला असे शिकवले ‘फिजिक्स’

Consumer Forum : सध्या सगळीकडे क्लासचे पेव फुटले आहेत. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने खासगी कोचिंग क्लासचे चांगलेच कान टोचले. न शिकवलेल्या कालावधीची फी व्याजासह परत करण्याचे ग्राहक आयोगाने आदेश दिले.

खासगी कोचिंग क्लासेस म्हणजे अभ्यासक्रमाच्या सीट विकण्याची लिलावगृहे नाहीत; ग्राहक आयोगाने क्लासला असे शिकवले 'फिजिक्स'
ग्राहक आयोगाचा शिकवणी वर्गाला दणका
Follow us
| Updated on: Aug 15, 2024 | 3:17 PM

सध्या सगळीकडे खासगी क्लासचे पेव फुटले आहेत. विद्यार्थी,पालकांचा शाळेपेक्षा क्लासवर अधिक विश्वास असल्याचे सार्वजनिक चित्र आहे. त्यातच क्लास चालक मनमानी करतात. अव्वाच्या सव्वा शुल्क वसूल करतात. अनेकदा क्लासच्या नावाखाली लूट होते. छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने खासगी कोचिंग क्लासचे चांगलेच कान टोचले. काय आहे हे प्रकरण, असा मिळाला विद्यार्थ्याला न्याय.

शुल्क व्याजासह परत करा

खासगी कोचिंग क्लासेस हे अभ्यासक्रमाच्या सीट विकण्याची लिलावगृहे नाहीत. त्यामुळे सात आठवड्यानंतर फी परत न करण्याच्या अटी-शर्थी, दोन वर्षाचे शुल्क पहिल्या सहा महिन्यातच जमा करणे, ज्या कालावधीत शिकवले नाही, त्याचे शुल्क आकारणे, ही अनुचीत प्रथा असल्याचे निरीक्षण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने नोंदवले. आयोगाने फिजिक्सवाला कोचिंग क्लासेसला शुल्क व्याजासह परत देण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाच्या अध्यक्षा शिल्पा एस डोल्हारकर व सदस्य गणेशकुमार सेलूकर आणि जान्हवी ए भिडे यांनी हा निकाल दिला.

हे सुद्धा वाचा

काय आहे प्रकरण

निकाल पत्रात नमूद केल्याप्रमाणे, आशिष घनश्याम वैष्णव यांनी तक्रार दाखल केली. त्यांचा मुलगा ओम याच्यासाठी त्यांनी फिजिक्सवाला कोचिंग क्लासेसमध्ये इयत्ता आकरावी आणि जेईईई या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला होता. क्लासेसने त्यांना ९६ हजार रूपये शुल्क आकारले. क्लासेसने पहिल्या काही महिन्यातच त्यांच्याकडून ६३,७३९ रुपये फी जमा करुन घेतले. ओम याला सकाळची बॅच हवी असताना सुरुवातीचे काही दिवस सकाळच्या बॅचमध्ये बसवले पण नंतर मात्र त्याला संध्याकाळच्या बॅचमध्ये टाकण्यात आले.

जवळपास ६१ दिवस त्याने क्लास केला. संध्याकाळच्या बॅचमध्ये जमत नसल्याने त्याने क्लासेस बंद केले आणि त्याच्या पालकांनी क्लासेसकडे फी परत मागितली. ती त्यांनी दिली नाही म्हणून अ‍ॅड. जी के बोरुडे यांच्यामार्फत आशिष वैष्णव यांनी ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली. भरलेली ६३,७३९ रुपये फी, मानसिक त्रासापोटी ३० हजार रुपये आणि तक्रारीचा खर्च २० हजार रुपये अशी एकुण १ लाख १३ हजार ७३९ रुपये नुकसान भरपाई त्यांनी मागितली. क्लासेने पण बाजू मांडली. त्यानुसार विद्यार्थी हा ६१ दिवस क्लासला उपस्थित होता. त्याने वर्गाची वेळ बदलण्याची विनंती केलेली नव्हती. फी परत करण्याबाबत एक धोरण ठरवलेले आहे. त्यानुसार सात आठवडे उलटून गेल्यानंतर फी परत केली जात नाही. असे म्हणत फी परत करण्यास नकार दिला.

क्लासचे टोचले कान

कोचिंग क्लासेस या खासगी असल्या तरी त्या अभ्यासक्रमाच्या जागा विकण्याची लिलावकेंद्रे नाहीत. क्लासेसने फक्त आपल्या नफ्याचाच विचार केलेला आहे. शिक्षण क्षेत्रात असा विचार करता येत नाही. दोन वर्षाची फी आधीच वसूल करुन घेणे, फी परत करण्याबाबतच्या अयोग्य अटी-शर्थी तयार करणे, ६१ दिवसानंतर शिकवलेले नसताना त्याचीही फी घेणे हा सर्व प्रकार अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे निरीक्षण आयोगाने नोंदवले.

येथे वाचा निकालपत्र : District Consumer Grievance Redressal Commissions Order

चार महिने शिकवले, त्याचे प्रतिमाह ४ हजार रुपये प्रमाणे १६ हजार रुपये वगळता बाकी ४७,७३९ रुपये ७ टक्के व्याजासह परत करावेत. तसेच मानसिक त्रासापोटी ५ हजार आणि तक्रारीचा खर्च ३ हजार असे एकूण ८ हजार रुपये भरपाई ४५ दिवसांत द्यावी. ती न दिल्यास त्यावर दोन टक्के व्याज आकारले जाईल, असा निकाल आयोगाने दिला.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.