AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाईट बातमी ! गाडीने हेलकावा घेतला, दोन तरुण निष्णात डॉक्टरांचा जागीच मृत्यू; बीडमधील दुर्देवी घटना

राज्यात काल तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात झाले आहेत. या अपघातात पाचजण ठार झाले असून सातजण जखमी झाले आहे. हे तिन्ही अपघात मराठवाड्यातील बीड, जालना आणि औरंगाबादमध्ये झाले आहेत. मृतांमध्ये दोन डॉक्टरांचा समावेश आहे.

वाईट बातमी ! गाडीने हेलकावा घेतला, दोन तरुण निष्णात डॉक्टरांचा जागीच मृत्यू; बीडमधील दुर्देवी घटना
Beed AccidentImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 6:54 AM

अंबाजोगाई : बीडमध्ये अत्यंत दुर्देवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. बीडकरांनी दोन तरुण आणि निष्णात डॉक्टरांना गमावले आहे. आरोग्य शिबिराहून परतत असताना डॉक्टरांच्या भरधाव कारने हेलकावा घेतला. त्यानंतर ही कार झाडाला जाऊन आदळली आणि या दोन्ही डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भयानक होता की कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर बघ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. काही वेळानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. मात्र, या घटनेमुळे संपूर्ण बीडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

बीडच्या आडस येथील आरोग्य शिबीरास भेट देवून परत येताना भरधाव वेगातील कारला भीषण अपघात झाला. अपघातात दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. अंबाजोगाई येथील फिजिओथेरेफिस्ट डॉ. प्रमोद बुरांडे आणि डॉ. रवी संतोष सातपुते अशी या मृत डॉक्टरांची नावे आहेत. हे दोघेही एकाच कारमधून प्रवास करत होते. आडस गावामध्ये आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

या शिबीराला भेट देण्यासाठी हे दोघेही डॉक्टर तेथे गेले होते. शिबीराला भेट देवून परत अंबाजोगाईकडे येत होते. त्यांची कार भरधाव वेगाने जात होती. तितक्यात समोरून एक गाडी आली. या गाडीला चुकवताना कारने हेलकावा घेतला आणि रस्त्यालगत असलेल्या झाडावर जाऊन कार आदळली. ही धडक अत्यंत जोरदार होती. इतकी की कारच्या भागाचा चक्काचूर झाला असून कारचं टपही छिन्नविछिन्न झालं आहे. या भयानक अपघातात दोन्ही डॉक्टरांचा मृत्यू झाला.

पोलिसांची घटनास्थळी धाव

या अपघाताची माहिती मिळताच बघ्यांनी एकच गर्दी केली. अनेकजण तर कारमधून डोकावून पाहताना दिसत होते. त्यानंतर काही वेळाने पोलीस आले. रुग्णवाहिका आली आणि या दोन्ही डॉक्टरांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कुणालाही ताब्यात घेण्यात आले नाही. तसेच पोलिसांनी या घटनेची माहिती या डॉक्टरांच्या कुटुंबीयांना दिली.

जालन्यात तीन ठार

दरम्यान काल जालना येथेही भीषण अपघात झाला. मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या वाहनाचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. जालना जवळील निधोना गावाजवळ हा अपघात झाला. अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये वृद्ध महिलेचा समावेश आहे. उभ्या आयशर ट्रकवर पाठीमागून मारुती इको कार धडकून हा अपघात झाल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

औरंगाबादेत सहा जखमी

औरंगाबाद येथे औरंगाबाद-नगर महामार्गावरही काल भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरची टेम्पोला धडक बसली. या धडकेत टेम्पोतील सहाजण जखमी झाले आहेत. जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही लोक या टेम्पोतून संसाराचं साहित्य घेऊन जात होते. त्यावेळी हा अपघात झाला.

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.