‘मी टरबुजाचा अपमान करु इच्छित नाही’, उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. ठाकरे यांची आज संभाजीनगर येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भूमिका मांडत असताना भाजपवर निशाणा साधला.

'मी टरबुजाचा अपमान करु इच्छित नाही', उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 7:31 PM

छत्रपती संभाजीनगर | 12 फेब्रुवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज छत्रपती संभाजीनगर शहरात जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. “दोन दिवसांपूर्वी आमच्या अभिषेकची हत्या झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणतात, अरे उद्या गाडीखाली कुत्र आलं तरी तुम्ही राजीनामा मागाल. अहो, देवेंद्र फडणवीस तुमची काय लायकी, तुमच्याबद्दल काय बोलावं, मला शब्द सूचत नाहीत. मी टरबुजाचा अपमान करु इच्छित नाही. अजिबात नाही. कुत्र्याचाही अपमान करु इच्छित नाही. कुणाचाच नाही. एकीकडे माझा आमदार शेतकऱ्याचं गुरा-ढोराचंही काही झालं तर विचारपूस करायला जाणारा आमदार कुठे आणि गाडी खाली कुत्रा आला तरी म्हणणारा आमचा हा नालायक नादान गृहमंत्री कुठे, हे आमचं हिंदुत्व आहे. तुमचं हिदुत्व काय?”, अशा खोचक शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली.

“मी मोदी सरकार मानत नाही, मी भाजप सरकार मानते. मोदी सरकार तुमच्या पक्षापुरता असेल, पण माझा हिंदुस्तान तुमच्या आधी कित्येक वर्षांपूर्वी जन्माला आलेला आहे. हे आमचं हिंदुत्व भाजपने जन्माला घातलेलं नाही. तर आधीपासून जन्माला घातलेला आहे. मराठवाडा ही संतांची भूमी आहे. मराठवाड्यात आम्हाला कुणी हिंदुत्व शिकवण्याच्या प्रयत्नात पडू नये”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘तो जातीपाती धर्माने कोणीही असला तरी…’

“माझ्यासोबत जो मुस्लिम समाज आला आहे त्यांना माहिती नाही की, मी हिदुत्ववादी आहे? माझ्या हाती भगवा झेंडा आहे. मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र आहे, हे माझ्याबरोबर आलेल्या मुसलमानांना माहिती नाही? तरीसुद्धा ते माझ्यासोबत येत आहेत. कारण कधीही माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी हिंदू धर्माचा अभिमान बाळगताना दुसऱ्या धर्माचा द्वेष करायला शिकवलं नाही. जो कुणी देशद्रोही असेल, तो जातीपाती धर्माने कोणीही असला तरी त्याला फासावर लटकवा हे आमचे हिंदुत्व आहे”, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.

“मधल्या काळात पुरुळकर सापडला आहे. भाजपने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तो सुद्धा यांचा कार्यकर्ता होता, असं म्हणतात. माझ्याकडे अधिकृत माहिती नाही. पण पुरुळकरने आपली माहिती, आपल्या देशाची गुपितं पाकिस्तानला दिल्याचं सिद्ध झालं तर तो जातीने, धर्माने हिंदू असला तरी त्याला भर चौकात फाशी द्या हे आमचं हिदुत्व आहे. जो आमच्या देशाशी गद्दारी करतो, कुणीही असला, तो आमचा नाही. जो माझा देशासाठी लढालया तयार आहे, रक्षणासाठी तयार आहे ते माझं हिंदुत्व आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.