AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahavikas Aaghadi : ‘मग तर यांची नैया डुबली म्हणून समजा’; महाविकास आघाडीला महायुतीमधील या बड्या नेत्याचा चिमटा

Sanjay Shirsat attack : शिंदे सेनेचे नेते संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. 'मग तर यांची नैया डुबली म्हणून समजा'; असा महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांना त्यांनी चिमटा काढला आहे.

Mahavikas Aaghadi : 'मग तर यांची नैया डुबली म्हणून समजा'; महाविकास आघाडीला महायुतीमधील या बड्या नेत्याचा चिमटा
महाविकास आघाडी
Follow us
| Updated on: Aug 15, 2024 | 2:26 PM

विधानसभेचा बिगुल थोड्याच दिवसात वाजेल. आता घोडा-मैदान आमने-सामने आहे. महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी नियोजन सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह इतर बड्या नेत्यांच्या भेटी-गाठी घेतल्या. उद्धव ठाकरे सक्रिय झाल्यानंतर महाविकास आघाडीची धुरा त्यांच्या खांद्यावर असल्याची चर्चा रंगली. त्यावर आता महायुतीने चिमटा काढला आहे. शिंदे सेनेतील नेते संजय शिरसाट यांनी असा टोला लगावला.

आज लाडक्या बहि‍णींच्या घरात दिवाळी

सरकारने ज्या घोषणा केल्या त्या परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. महिला – भगिनीच्या अकाउंट मध्ये जेव्हा 3 हजार रुपये जातात तो आनंद सर्वसामान्य कुटुंबांनाच माहित आहे. म्हणून आज त्याच्याघरात दिवाळी आहे. तुमच्या माझ्या सारख्याना तीन हजारांच महत्व कळणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांचे वैशिष्ट्य आहे ते जे बोलतात ते करतात. काही लोकांनी टीका करण्याचा प्रयत्न केला. काही लोकांचा पोटसूळ उठलं याच्याने काय होतं, त्याच्याने काय होतं.

हे सुद्धा वाचा

आज महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणी शिंदे साहेबांना मन भरून आशीर्वाद दिले असतील. आमचा पाठीराखा, आमचा भाऊ आमच्या पाठीशी उभा आहे, हे म्हणणाऱ्या लाखो बहिणी असा दिवस आनंदाने साजरा करतात, असे शिरसाट म्हणाले.

अशी मदत करायला दानत लागते

या योजनेवरुन महाविकास आघाडीतून हल्लाबोल सुरू आहे. संजय शिरसाट यांनी त्यावरुन संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ह्या चर्चा केव्हा सुरू होतात जेव्हा कोणी देत, तुम्ही का दिले नाही हा माझा प्रश्न आहे. तुम्ही अंगणवाडी महिला, बालवाडी सेविकांना दिले नाहीत, हे सर्व या शासनाने दिलं. तुम्हाला जेव्हा संधी होती तेव्हा तुम्ही लोकांना भेटत नव्हते त्यांचे काम करत नव्हते, असा आरोप शिरसाट यांनी राऊतांवर केला. तुमच्याकडे सांगण्यासारखं काही नाही फक्त टीका करणे आमच्याकडे काय आह. दानत असावी लागते, असे खोचक टोला त्यांनी लगावला.

योजना राबवायची तर वित्तीय तूट होणार

योजनेमुळे दोन लाख कोटींची वित्तीय तूट येणार असल्याच्या मुद्दावर पण त्यांनी प्रतिक्रिया दिली. काही द्यायचं म्हटल्यावर वित्तीय तूट निर्माण होणार आहे पण याला कसं मॅनेज करायचं हे सरकार ठरवेल. लाखो करोडो रुपये इतरत्र खर्च केले जातात मग त्यात भ्रष्टाचार झाला, योजनेत तुम्हाला कुठे भ्रष्टाचार दिसतो का डायरेक्ट अकाउंट वर पैसे येतात. लाडकी बहीण सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. झोपडीत माझी लाडकी बहीण, मोलमजुरी करणारे माझी लाडकी बहीण तिच्या पर्समधून ती पैसे काढणार आहे, असे ते म्हणाले.

तर त्यांची नैय्या डुबलीच म्हणून समजा

महाविकास आघाडीत प्रचाराची धुरा उद्धव ठाकरेंच्या हाती असल्याच्या चर्चेवर संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीला चिमटा काढला. मग तर यांचे नैया डुबली म्हणून समजा. डिव्हिजन वाईज चार सभा होतील आणि प्रचार संपेल. काँग्रेस आणि शरद पवार धुरा वगैरे देणार नाहीत परंतु जबाबदारी घेण्याची सुद्धा यांची मानसिकता नाही. खऱ्या अर्थाने लोकांना प्रश्न पडतोय पक्षप्रमुख कोण उद्धव ठाकरे साहेब आहेत की संजय राऊत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले.
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त.
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन.
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा.
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब.
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?.
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट.
मुरिदकेच्या हल्ल्याचा आवाज... परदेशी पत्रकाराचा दावा, सांगितलं वास्तव
मुरिदकेच्या हल्ल्याचा आवाज... परदेशी पत्रकाराचा दावा, सांगितलं वास्तव.