Marathwada Politics : बदल हवा तर चेहरा नवा; मराठवाड्यात दंगल दंगल; अनेक मतदार संघात काँटे की टक्कर
Marathwada Constituency : मराठवाडा ही संताची भूमी आहे. आता ती आंदोलनाची भूमी आणि परिवर्तनाची नांदी ठरली आहे. लोकसभा निकालात राज्यात सर्वात तीव्र प्रतिक्रिया मराठवाड्यातून उमटली. भाजपला खातं उघडता आलं नाही, शिंदे सेना तरली. लोकसभेनंतर विधानसभेला मराठवाड्यात राजकीय दंगल पाहायला मिळणार आहे.

देशातील राजकीय बदलाचे वारे राज्यातून वाहते, हे अनेकदा महाराष्ट्राने अधोरेखित केले आहे. महाराष्ट्र हा चळवळीचा खंदा समर्थक राहिला आहे. तर आंदोलनाच्या रुपात मराठवाडा राज्याच्या केंद्रस्थानी आला आहे. मराठवाडा ही संताची भूमी, आता ती आंदोलनाची ऊर्जा झाली आहे. परिवर्तनाची नांदी ठरली आहे. लोकसभा निकालात राज्यात सर्वात धक्कादायक निकाल मराठवाड्याने दिला आहे. डबल इंजिन सरकार असताना भाजपला येथे खातं उघडता आलं नाही. तर शिंदे सेना एका जागेवर तरून गेली. महाविकास आघाडीला पाठबळ मिळाले. आता विधानसभेत मराठवाड्यात राजकीय दंगल पाहायला मिळणार आहे. राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणाऱ्या मराठवाड्यात परिवर्तनाची लाट कायम राहिल की यावेळी योजनांचा पाऊस पाडून महायुती लोकसभेचे मळभ धुवून काढेल, हे जनता जनार्दन ठरवेल. पण राज्यात अतिशय चुरशीच्या लढती होतील, हे सांगायला ना ज्योतिषाची गरज आहे ना राजकीय पंडिताची… ...