मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी का झाली? तिथे काय घडलं? वाचा Inside Story
लोकसभा उमेदवार ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी झाली आहे. मराठा समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते आपसातच भिडले. लाथा-बुक्क्यांनी माराहण करण्यात आली. नेमक हे का घडलं? त्यामागे काय कारण आहेत? हे समजून घ्या.
आज मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी झाली. लोकसभा उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक सुरू होती. मराठा मंदिरमध्ये मराठा समाजाची बैठक सुरू असताना हा सर्व वाद झाला. आज सकाळी 11 वाजता मराठा समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. मनोज जरांगे यांच्या सूचनेनुसार उमेदवार ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. 60 ते 70 समाज बांधव बैठकीला उपस्थित होते. सुरुवातीला बैठक शांततेच्या मार्गाने सुरू होती, मात्र अचानक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काही कार्यकर्त्यांनी विशिष्ट उमेदवाराकडून पैसे घेऊन बैठक आयोजित केल्याचा आरोप केला.
आरोपानंतर विकी पाटील या तरुणाला बेदम मारहाण करायला सुरुवात झाली. बाळू औताडे या तरुणाकडून सुरुवातीला मारहाण झाली. त्यानंतर इतरही तरुणांनी मारहाण केली. मारहणीनंतर बैठक उधळली गेली आणि पुढे बराच वेळ राडा सुरू होता. राडा झाल्यामुळे उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे. या राड्यानंतर महाराष्ट्रातून उमेदवार उभे करण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मतभेद झाले तर काय करायच ठरलेलं?
सध्या पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वातावरण शांत आहे. कोणी कोणाच नाव घेऊन बोलायच नाही, असं ठरलेलं. मात्र तरीही काही नाव घेण्यात आली. त्यावरुन ही सर्व वादावादी, हाणामारी झाली असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. काही मतभेद असतील, तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जायच असं ठरलेलं. मात्र काही जणांची नाव पुकारण्यात आली, त्यावरुन वादावादी झाली, असं बैठकीत सहभागी असलेल्यांनी सांगितलं.