‘श्रीमंत मराठ्यांना एक टक्काही आरक्षण नको, पण बहुजनांना जो न्याय, तोच गरीब मराठ्यांनाही द्या’

जेव्हा एखादी गोष्ट राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवायची असते, तेव्हा मोर्चे काढले जातात. | Sambhajiraje Chhatrapati

'श्रीमंत मराठ्यांना एक टक्काही आरक्षण नको, पण बहुजनांना जो न्याय, तोच गरीब मराठ्यांनाही द्या'
संभाजीराजे छत्रपती
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 12:10 PM

औरंगाबाद: सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला ‘सत्ताधारी’ (पॉवर्ड क्लास) ठरवलं म्हणून आम्ही गप्प बसायचं का? आम्हाला कायद्याशी देणघेणं नाही. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी लागू केलेली रचना आजच्या महाराष्ट्राला लागू झालीच पाहिजे. बहुजनांना जो न्याय मिळाला तो मराठा समाजालाही मिळालाच पाहिजे, असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati ) यांनी केले. (MP Sambhajiraje Chhatrapati on Maratha Reservation)

ते बुधवारी औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी आपण सध्या राज्यभरात फिरून मराठा समाजाच्या भावना जाणून घेत असल्याचे सांगितले. मी अनेक कायदेतज्ज्ञ आणि अभ्यासकांना भेटत आहे. आता 28 तारखेला मी माझी अंतिम भूमिका स्पष्ट करेन, असे संभाजीराजे यांनी म्हटले.

मी आतापर्यंत ज्या भेटीगाठी घेतल्या त्यामधून मला अनेक नव्या गोष्टी समजल्या आहेत. मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश शक्य नाही. 2018 साली एनबीसी कमिशनने काढलेल्या अधिसूचनेमुळे ती गोष्ट शक्य नाही. त्यामुळे आता यावर काही मार्ग काढता येतो का, यासाठी मी सध्या मराठा समाजातील अभ्यासक आणि जाणकारांची मते जाणून घेत असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

मोर्चे काढण्याची गरजच काय?

जेव्हा एखादी गोष्ट राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवायची असते, तेव्हा मोर्चे काढले जातात. मराठा समाजाने 58 मोर्चे काढून आपलं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवलं आहे. मराठा समाजाला काय हवंय, हे राज्यकर्त्यांना माहिती आहे. मग परत एकदा मोर्चे काढून लोकांना वेठीस का धरायचे, असा सवाल संभाजीराजे यांनी इतर मराठा नेत्यांना विचारला.

रस्त्यावर उतरून कोरोनामुळे लोक मेले तर काय करायचं? राज्य सरकारने दखल घेतली नाही तर आंदोलन करावेच लागेल. मात्र, सर्वप्रथम राज्यकर्ते मराठा समाजासाठी कोणत्या गोष्टी करायला तयार आहेत, हे त्यांनी सांगावे. श्रीमंत मराठ्यांना एक टक्काही आरक्षण देऊ नका. पण 30 टक्के गरीब मराठा समाजाला मदत मिळालीच पाहिजे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

‘चंद्रकांत पाटील आणि मेटेंच्या मनातलं ओळखायला मी काय ज्योतिषी आहे का?’

कोरोनाच्या काळात मोर्चे काढू नयेत, ही माझी भूमिका मी अगोदरच स्पष्ट केली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि विनायक मेटे यांना काय वाटते, हे जाणून घ्यायची मला गरज वाटत नाही. त्यांच्या मनातल्या गोष्टी ओळखायला मी काय ज्योतिषी आहे का, असा प्रतिप्रश्न संभाजीराजे यांनी केला.

कोणत्याही नेत्यांनी मराठा समाजाचा वापर राजकारणासाठी करु नये. त्याऐवजी तुम्ही मराठा समाजासाठी काय करणार, हे सांगावे. राज्य सरकार मराठा समाजासाठी अटी कशाप्रकारे शिथील करु शकते, हेदेखील सांगावे, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली. संबंधित बातम्या:

‘प्रियांका, कंगनाला भेटणाऱ्या पंतप्रधान मोदींनी संभाजीराजेंना वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अवमान’

पंतप्रधान मोदींना वाटतं मराठा आरक्षण राज्याचा विषय, त्यामुळे संभाजीराजेंना भेटले नाहीत: चंद्रकांत पाटील

छत्रपतींचे वंशज, मराठा आरक्षणाच्या लढाईतील प्रमुख योद्धा, जाणून घ्या खासदार संभाजीराजेंची राजकीय कारकीर्द

(MP Sambhajiraje Chhatrapati on Maratha Reservation)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.