मोठी बातमी | संभाजीराजे राज्यसभा निवडणूक लढणार नाहीत? थोड्याच वेळात पुण्यात घोषणा करणार, सूत्रांची माहिती

राज्यसभेची (Rajya Sabha Election) जागा विजयी होण्यासाठी मतांचं गणित जमणार नसल्याची चिन्हं दिसल्याने संभाजीराजे निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. पुढील काही वेळातच यावर शिक्कामोर्तब होईल.

मोठी बातमी | संभाजीराजे राज्यसभा निवडणूक लढणार नाहीत? थोड्याच वेळात पुण्यात घोषणा करणार, सूत्रांची माहिती
छत्रपती संभाजीराजेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 1:07 PM

मुंबईः कोल्हापूरचे संभाजीराजे (Sambhajiraje) राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे. येत्या काही वेळातच संभाजीराजे पुण्यातून सदर घोषणा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील वेळी राज्यसभेवर संभाजी राजेंना भाजपतर्फे पाठिंबा देण्यात आला होता. यंदा त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. याकरिता सर्वपक्षीय पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी विनंती केली होती. शिवसेनेने अपक्षांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्याऐवजी शिवसेनेत आल्यास आम्ही उमेदवारी देऊ, असा प्रस्ताव संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला होता. मात्र संभाजीराजेंनी हा प्रस्ताव फेटाळल्याने शिवसेनेने राज्यसभेवर दुसरा उमेदवार उभा केला. अशा रितीने राज्यसभेची (Rajya Sabha Election) जागा विजयी होण्यासाठी मतांचं गणित जमणार नसल्याची चिन्हं दिसल्याने संभाजीराजे निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. पुढील काही वेळातच यावर शिक्कामोर्तब होईल.

‘मी जनतेशी बांधील’ फेसबुक पोस्टचा रोख कुठे?

दरम्यान, संभाजीराजेंनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट शेअर केली असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतानाच फोटो त्यात शेअर केला आहे. मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेतलं स्वराज्य घडवायचं आहे. मी त्यांच्या विचारांशी कटिबद्ध असेन. मी फक्त जनतेशी बांधील आहे, असा मजकूर त्यांनी या पोस्टमध्ये लिहिला आहे. या फेसबुक पोस्टचा रोख नेमका कोणत्या दिशेने आहे, यावर तर्क वितर्क लावले जात आहेत. ही पोस्ट शिवसेनेच्या दिशेने रोख करतेय, अशीही चर्चा आहे. मात्र पुढील काही वेळातच संभाजीराजे यामागील भूमिका स्पष्ट करतील.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय परवार हे दोघेही आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही नेते राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. राज्यसभेसाठी शिवसेना जो उमेदवार देईल त्याला पाठिंबा देऊ, असं शरद पवारांनी सांगितलं होतं. त्यावेळी हा अर्ज भरताना शरद पवार हजर असतील.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.