‘ते’ पत्र एका महिलेचं, धमकीच्या पत्रावरून संभाजीनगरचे आमदार धास्तावले, लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार

गुंड प्रवृत्तीचे लोक तुम्हाला जीवे मारणार आहेत, अशा आशयाचं पत्र संभाजीनगरातील आमदाराला प्राप्त झाले आहे.

'ते' पत्र एका महिलेचं, धमकीच्या पत्रावरून संभाजीनगरचे आमदार धास्तावले, लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 4:08 PM

दत्ता कनवटे, छत्रपती संभाजीनगर : राज्यात एकानंतर एक राजकीय नेत्यांना धमक्या येत असतानाच संभाजीनगरातही (Sambhajinagar) खळबळ माजली आहे. इथल्या एका शिंदे गटातील आमदाराला (MLA) धमकीचं पत्र आलंय. हे पत्र नेमकं कुणी पाठवलंय, त्यामागील काय हेतू आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र आमदाराने पोलिसात धाव घेतली आहे. या पत्राविषयी सविस्तर माहिती दिली असून लवकरच या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार असल्याचं या आमदाराने सांगितलंय.

कुणाला आलंय पत्र?

संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार रमेश बोरनारे यांना हे धमकीचं पत्र आलंय. या पत्राविषयी आमदाराने सविस्तर सांगितलं. ते म्हणाले, ‘ मला धमकीचे पत्र चार दिवसांपूर्वी आले आहे. अहमदनगरहून पोस्टाने हे पत्र आले आहे. या पत्रात चार ओळींचा संदेश आहे. गुंड प्रवृत्तीचे लोक तुम्हाला जीवे मारणार आहेत, असा मजकूर त्यात आहे. तसेच एका महिलेने हे पत्र पाठवलं असल्याचं बोरनारे यांनी सांगितलंय.

राजकीय वैमनस्य?

आमदार रमेश बोरनारे यांना ही धमकी कोणत्या कारणासाठी आली आहे, त्यांचा कुणाशी वाद झाला होता का, काही पूर्व वैमनस्य उफाळून आले आहे का, याचा तपास सध्या पोलीस घेत आहेत. वैजापूर पोलीस ठाण्यात आमदार बोरनारे यांनी यासंदर्भात तक्रार नोंदवली आहे. यामागे फक्त राजकारण आहे, असा माझा अंदाज आहे. माझा वैयक्तिक कुठलाही वाद नाही. राजकीय हेतूने ही मला धमकी देण्यात आली आहे, या पत्राची चौकशी झाली पाहिजे. अहमदनगरहून टपालाने मला हे पत्र आलंय. मी या बाबत पालकमंत्री संदीपान भूमरे यांना मी बोललो आहे. दोन दिवसात मुख्यमंत्र्यांना भेटून कल्पना देणार आहे, अशी माहितीही रमेश बोरनारे यांनी दिली आहे.

राज्यात धमक्यांची मालिका

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांना धमकीचे संदेश आले आहेत. अगदी मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा कॉल आला होता. पोलीस कंट्रोल रुममध्ये हा कॉल आला होता. या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. मात्र सदर आरोपी दारुच्या नशेत होता. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही कर्नाटकातल्या जेलमधून जयेश पुजारी या आरोपीने धमकी दिल्याचं उघड झालंय. पुजारी हा सध्या नागपूर पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.