‘महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या कलेला…’, संभाजीराजे गौतमी पाटील हिच्याबद्दल नेमकं काय म्हणाले?

संभाजीराजे छत्रपती यांनी डान्सर गौतमी पाटील हिला आधी पाठिंबा दिला होता. पण नंतर त्यांनी आपली भूमिका मागे घेतली आहे. संभाजीराजे यांनी ट्विटरवर आपली सविस्तर भूमिका मांडली आहे.

'महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या कलेला...', संभाजीराजे गौतमी पाटील हिच्याबद्दल नेमकं काय म्हणाले?
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 9:56 PM

मुंबई : राज्यसभेचे माजी खासदार आणि छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी नृत्यांगना गौतमी पाटील हिला आधी पाठिंबा दिलेला. पण नंतर काही तासांनी त्यांनी आपला पाठिंबा काढून घेतला आहे. गौतमी पाटील हिच्या आडनावावरुन सध्या वाद सुरु आहेत. काही मराठा संघटनांनी गौतमी पाटील हिच्या पाटील आडनावावर आक्षेप घेतला आहे. तिने आपल्या नावापुढे पाटील असं आडनाव लावू नये. अन्यथा तिचा कार्यक्रम बंद पाडण्याचा इशारा काही मराठा संघटनांनी दिला आहे. तर दुसरीकडे काही मराठा संघटनांनी गौतमी पाटील हिला पाठिंबा दर्शवला आहे. या वादाबाबत संभाजीराजे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी गौतमीचं समर्थन केलेलं.

संभाजीराजे आधी नेमकं काय म्हणाले होते?

“छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांना संरक्षण दिलं. त्यामुळे स्वातंत्र्य सर्वांना आहे. महिलांनाही स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र हे वेगळं राज्य आहे. त्यामुळे सर्वांनी गौतमी पाटील यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. कलाकाराला संरक्षण मिळालं पाहिजे, मी या मताचा आहे”, अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली. पण त्यानंतर काही तासांनी संभाजीराजे यांनी आपली भूमिका मागे घेतली. त्यांनी ट्विटरवर आपली सविस्तर भूमिका मांडली.

हे सुद्धा वाचा

संभाजीराजे ट्विटरवर नेमकं काय म्हणाले?

“काल एका पत्रकाराने एका महिलेचा कलाकार असा उल्लेख करत, तिला त्रास व धमक्या दिल्या जात आहेत म्हणत मला प्रतिक्रिया विचारली. मला त्या व्यक्तीची व तिच्या कलेची काहीही माहिती नव्हती. पण महिला कलाकाराला धमक्या येणे हे चुकीचे समजून मी बोलून गेलो की कलाकारांना संरक्षण दिले पाहिजे”, असं संभाजीराजे आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाले.

“मात्र आज त्याचे नकारात्मक पडसाद उमटल्यावर आश्चर्याने या कलाकाराची “कला” मी बघितली. आता असे वाटत आहे, महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण”, अशी भूमिका संभाजीराजे यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये मांडली आहे.

‘मी पाटीलच आहे’, गौतमीची प्रतिक्रिया

दरम्यान, पाटील आडनावर सुरु असलेल्या वादावर स्वत: गौतमीने प्रतिक्रिया दिली आहे. “मी पाटीलच आहे आणि हेच नाव मी वापरतेय. माझ्याबद्दल कोणी काहीही बोलले तरी मला काही फरत पडत नाही. मी जे कार्यक्रम करते ते, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत म्हणून माझे हे कार्यक्रम लोकांना जास्त आवडतात”, असं गौतमी पाटील म्हणाली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.