मराठा आरक्षणाची डेडलाईन संपणार त्याच दिवशी संभाजीराजे यांचा मोठा कार्यक्रम; विशाळगडावर येण्याची हाक

मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी जी डेडलाईन दिली आहे त्याचदिवशी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सर्व शिवभक्तांना विशाळ गडावर येण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे येत्या 13 जुलैला मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

मराठा आरक्षणाची डेडलाईन संपणार त्याच दिवशी संभाजीराजे यांचा मोठा कार्यक्रम; विशाळगडावर येण्याची हाक
संभाजीराजे छत्रपती आणि मनोज जरांगे पाटील यांचा फोटो
Follow us
| Updated on: Jul 07, 2024 | 7:25 PM

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी 13 जुलै ही शेवटची तारीख दिली आहे. राज्य सरकारने 13 जुलैपर्यंत सगेसोयरेचा अध्यादेश बनवला नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी जी डेडलाईन दिली आहे त्याचदिवशी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सर्व शिवभक्तांना विशाळ गडावर येण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे येत्या 13 जुलैला मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली.

“छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन कसं पुढे जायला पाहिजे याची आज वेळ आली आहे. विशाळ गडाला खूप मोठा इतिहास आहे. त्यामुळे मी विशाळ गडावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. अतिक्रमण, पशु हत्या केली जाते हे ऐकून होतो. पण दीड वर्षांपूर्वी मी विशाळ गडावर गेलो. गडावर गेल्यानंतर आणि सगळी दृश्य पाहिल्यावर मला खूप दुःख झालं. मी तत्काळ जिल्हाधिकारी यांना भेटलो आणि जे अतिक्रमण झालं ते हटवण्याची मागणी केली. अतिक्रमण दोन्ही बाजूने झालं आहे. आम्ही कुणाच्या धर्माच्या विरोधात नाही”, अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी मांडली.

‘कत्तलखाना बंद व्हावा’

“शिवाजी महाराज यांचा किल्ला असताना इथं मद्यपान केलं जातं. कत्तलखाना बंद व्हावा, अशी आम्ही मागणी केली. महाशिवरात्रीच्या आधी सगळे अतिक्रमण काढू असं आश्वासन दिलं आणि काम चालू केलं. पण तातडीने त्याला कोर्टात जाऊन स्थगिती देण्यात आली. त्यामुळे अतिक्रमण काढणे बंद झाले. आता शिवभक्त प्रश्न विचारू लागले की, राजे तुम्ही का भूमिका घेत नाही? मला आनंद आहे की पुन्हा ही चळवळ सुरू झाली आहे”, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

“कुणी अतिक्रमण केलं, कोणत्या गोष्टीचं अतिक्रमण केलं हे शासनाला माहिती आहे. दोन्ही बाजूने झालेलं अतिक्रमण काढावे, अशी माझी मागणी आहे. दीड वर्षांपूर्वी स्थगिती आल्यानंतर सरकारने काय केलं? याचं उत्तर सरकारला द्यावेच लागेल. त्यामुळे आता गप्प बसून चालणार नाही, कुठंतरी भूमिका घेतलीच पाहिजे”, असं संभाजीराजे म्हणाले.

’13 तारखेला दुपारी 2 वाजता सर्व शिवभक्त…’

“विशाळ गडावरील अतिक्रमण काढणं हेच मोठं संकट आहे. आता 13 जुलैला माझ्यासकट सर्व शिवभक्त विशाळगड इथं जाणार. आता शिवभक्तांना हे सरकार थांबवू शकत नाही. जी स्थगिती आली त्यावर एकदाही वाद विवाद झाला नाही. ही सरकारच्या कामाची पद्धत आहे. त्यामुळे 13 तारखेला दुपारी 2 वाजता सर्व शिवभक्त विशाळगडावर जातील. आम्हाला पोलिसांची भीती दाखवाल, पण आम्ही घाबरणार नाही”, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला.

“शिवाजी महाराज यांनी सगळ्या गोष्टी सांगून केल्या नाही, पण आम्ही काही गनिमी कावा करणार नाही. मला इतकंच माहिती आहे की अन्यायाच्या विरोधात उभं राहायची भूमिका माझी आहे. आमची एकच मागणी आहे की अतिक्रमण काढून टाकावे”, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली.

“मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासमोर राजसदरेवरून सांगितलं होतं की, संभाजीराजे तुमच्या मनातील विशाळगड आहे, तेच आमच्या मनात आहे. आता आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या मनातील बघायचं आहे. 13 जुलै चलो विशाळगड दुपारी 12 वाजता. 1947 नंतर राजे वैगेरे कोण नाही. नागरिक आम्हाला राजे म्हणतात हे ठीक आहे”, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.