विळखा वाढला, सांगलीत एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण
एकट्या सांगलीत कोरोनाबाधितांची (Sangli corona positive) संख्या नऊवर पोहोचली आहे. धक्कादायक म्हणजे हे सर्व एकाच कुटुंबातील (Sangli corona positive) आहेत.
सांगली : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकट्या सांगलीत कोरोनाबाधितांची (Sangli corona positive) संख्या नऊवर पोहोचली आहे. धक्कादायक म्हणजे हे सर्व एकाच कुटुंबातील (Sangli corona positive) आहेत. या कुटुंबातील आधीच चौघांना कोरोनाची लागण झाली होती. हे चौघे हज यात्रा करुन आले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांची चाचणी केली असता, आणखी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात २५ मार्च सकाळी ११.३० पर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ११२ वर पोहोचली.
हे कुटुंब इस्लामपूरमधील आहे. महत्त्वाचं म्हणजे या कुटुंबाने एका लग्न समारंभालाही हजेरी लावली होती. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या २७ जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती, जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.
सांगलीतील या कोरोनाबाधित रुग्णांवर मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यामध्ये आणखी पाच जणांची भर पडली आहे.
आधी चौघांना लागण
इस्लामपुरातील या कुटुंबातील आधी चौघांना कोरोना लागण झाल्याची माहिती दोन दिवसापूर्वी समोर आली होती. हे चारही जण नुकतेच सौदी अरेबियातून आले होते. ते हज यात्रेसाठी सौदी अरेबियात गेले होते. संबंधित कोरोना बाधित रुग्णांना सौदी अरेबियातून आल्यापासून क्वारंटाईन सेंटरमध्ये निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. त्या चौघांचे कोरोना अहवाल दोन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. या सर्वांवर मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
मुंबई – 41 पुणे – 19 पिंपरी चिंचवड – 12 सांगली – 9 कल्याण – 5 नवी मुंबई – 5 नागपूर – 4 यवतमाळ – 4 अहमदनगर – 3 ठाणे – 3 सातारा – 2 पनवेल – 1 उल्हासनगर – 1 वसई विरार – 1 औरंगाबाद – 1 रत्नागिरी – 1
एकूण 112
संबंधित बातम्या
सांगलीत एकाच कुटुंबातील चौघांना कोरोना, राज्यातील रुग्णांची संख्या 98 वर