सांगली जिल्ह्यातील बाजार समितीच्या चुरशीच्या निवडणुकीत कुठे भाजपचा तर कुठे राष्ट्रवादीचा धुव्वा

सांगलीमध्ये अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. बाजार समित्यांच्या निकालात राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी वर्चस्व कायम ठेवलं आहे. काही ठिकाणी मात्र पाणीपत देखील झालं आहे.

सांगली जिल्ह्यातील बाजार समितीच्या चुरशीच्या निवडणुकीत कुठे भाजपचा तर कुठे राष्ट्रवादीचा धुव्वा
Sangli APMC Election 2023
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 2:53 PM
सांगली : अत्यंत चुरशीने पार पडललेल्या सांगली जिल्ह्यातील तीन कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल आज लागले आहेत. ज्यामध्ये सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची वज्रमूठ पाहायला मिळाली आहे,तर राष्ट्रवादी काँग्रेसने इस्लामपूरची बाजार समिती आपल्याकडे पुन्हा राखण्यात यश मिळवले,तर विटा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेना शिंदे गट,भाजपा आणि काँग्रेस आघाडीच्या पॅनलने बाजी मारली आहे. सांगली जिल्ह्यातल्या सात बाजार समितीच्या निवडणुका पार पडत आहे. त्यापैकी दोन बाजार समितीच्या निवडणुका बिनविरोध झाले आहेत. ज्यापैकी तीन बाजार समितीसाठी गुरुवारी मतदान झालं होतं, आज याची मतमोजणी पार पडली आहे.

महाविकासआघाडी विरुद्ध भाजप पॅनलमध्ये प्रमुख लढत

सांगली आणि इस्लामपूर बाजार समितच्या निवडणूका जिल्ह्यामध्ये सगळ्यात लक्षवेधी ठरल्या होत्या. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा पॅनलमध्ये प्रमुख लढत झाली होती. महाविकास आघाडीने भाजपाचा पुरता धुवा उडवलेला आहे. 18 पैकी तब्बल 17 जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. तर एक अपक्ष उमेदवार या ठिकाणी निवडून आला आहे. त्यामुळे भाजपाला महाविकास आघाडीकडून सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत धोबीपछाड देण्यात आला आहे.

भाजपला मोठा धक्का

या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील आणि काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर दुसऱ्या बाजूला भाजपाचे कामगार तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री सुरेश खाडे, भाजपाचे खासदार संजय काका पाटील आणि माजी आमदार विलासराव जगताप यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण भाजपाला बाजार समिती  निवडणुकीमध्ये आपलं खातं देखील उघडता आलं नाही.
इस्लामपूर या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्रित येत आघाडी उभे केली होती. अनेक वर्षांपासून आपली सत्ता एक हाती राखण्यात जयंत पाटील यांना यश मिळाले आहे.सर्व पक्ष एकत्रित आलेला असताना जयंत पाटलांनी इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक हाती सत्ता मिळवलेली आहे 18 पैकी 17 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनलचे उमेदवार हे विजय झालेले आहेत.

विटा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे पानिपत

या ठिकाणी सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना,भाजपा आणि काँग्रेस आघाडीच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. अठराच्या अठरा जागांवर शिवसेना, भाजप,काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे,शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर,काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम व भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अरुण लाड, राष्ट्रवादीचे माजी आमदार सदाशिव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.मात्र एकही जागेवर राष्ट्रवादीला यश मिळालं नाही.

पाच पैकी दोन बाजार समित्यांमध्ये आता काँग्रेस,राष्ट्रवादीची सत्ता आली आहे,तर एक ठिकाणी शिवसेना काँग्रेस भाजप यांच्या आघाडीची सत्ता आली आहे,आता उद्या तासगाव आणि आटपाडी बाजार समितीसाठी मतदार आणि मतमोजणी पार पडणार आहे,त्यामुळे  त्या दोन बाजार समितीच्या मध्ये कुणाचं वर्चस्व असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.