Sangli Flood : कोल्हापूर, सांगलीत यंत्रणा सज्ज, शिरगावला पाण्याचा वेढा, 1200 लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरु – जयंत पाटील
कृष्णा खोऱ्यात झालेल्या अतिरिक्त पावसामुळे पाणी सोडावं लागलं. त्यामुळे सांगली आणि परिसरात पुरस्तिथी निर्माण झाली आहे. मात्र, यंत्रणा सज्ज असल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.
सांगली : चिपळूण आणि महाडमध्ये पुरानं थैमान घातलं आहे. महाड, चिपळूण आणि साताऱ्यात दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात 50 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे कोल्हापूर आणि सांगलीमध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे. असं असलं तरी कोल्हापूर, सांगलीमध्ये यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिलीय. कृष्णा खोऱ्यात झालेल्या अतिरिक्त पावसामुळे पाणी सोडावं लागलं. त्यामुळे सांगली आणि परिसरात पुरस्तिथी निर्माण झाली आहे. मात्र, यंत्रणा सज्ज असल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. (Flood situation in Kolhapur, Sangli, Jayant Patil informed)
सांगलीतील शिरगावला चारही बाजूने पाण्याने वेढल्याने नागरिक अडकले आहेत. मात्र, शिरगावातून 200 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. संध्याकाळपर्यंत अजून 1 हजार 200 जणांना बाहेर काढलं जाईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलीय. ते पिंपरीमध्ये बोलत होते. कर्नाटकसरकार बरोबर चर्चा सुरु आहे. अलमट्टी धरणातून 2 लाख क्युसेक्सनं पाणी सोडावं अशी विनंती केली आहे. मात्र, अजून पाणी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत पोहचले आहे. त्याची माहिती अलमट्टीपर्यंत दिल्याचं पाटील म्हणाले. ज्या भागात मुसळधार पावसाने नुकसान झाले आहे, त्या भागात मुख्यमंत्र्यांसह मंत्री जातील, पण आज लोकांना वाचवणं महत्वाचे आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कंट्रोल रूममध्ये बसून मदतीचे नियंत्रण आणि मार्गदर्शन करत आहेत. आपणही सांगलीत पोहोचत आहोत, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
सर्व ठिकाणी सर्वतोपरी मदत – पाटील
कालपासून जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. सर्व यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यात येत आहे. फक्त शिरगावला चहुबाजूंनी पाण्याने वेढलं आहे. तिथून देखील 200 नागरिकांना बाहेर काढलं आहे. आताही तिथं बचावकार्य सुरु आहे. संध्याकाळपर्यंत इथले लोक सुखरूप बाहेर येतील. त्यामुळे सर्व ठिकाणी सर्वतोपरी मदत पुरवली जात आहे. त्यामुळे सरकारचे कोणतेही दुर्लक्ष नाही, असा दावा पाटील यांनी केलाय.
कोयना धरणात 24 तासात 18 टीएमसी पाण्याची आवक
कोयना धरणात एका दिवसात 12 टीएमसी पाणी येण्याचा विक्रम आहे. मात्र, गेल्या 24 तासात 18 टीएमसी पाणी आल्याची माहितीही त्यांनी दिली. कोयना धरणात सध्या 82.50 टीएमसी पाणी आहे. सहानंतर पावसाने उसंत दिली आहे. आणखी पाऊस पडला तर परिस्थिती बिघडेल. हातात काही राहणार नाही, म्हणून पाण्याचा जास्तीत जास्त विसर्ग करण्याच्या सूचना दिल्याची माहितीही यावेळी पाटील यांनी दिलीय.
मागच्या काही दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरू आहे.त्यामुळे कृष्ण खोऱ्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. प्रशासनाने सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत मात्र काळजी म्हणून नेहमी संकटात असणाऱ्या गावांनी स्थलांतरित व्हावं. pic.twitter.com/lIaGXmnmiM
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 23, 2021
संबंधित बातम्या :
Satara Landslide: साताऱ्यात आंबेघर गावात दरड कोसळली, 12 जणांचा मृत्यू
Flood situation in Kolhapur, Sangli, Jayant Patil informed