Sangli | माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सोहळा
शिराळा मतदार संघातील गावांच्या स्थितीवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, ' एकेकाळी या भागात पाणी प्रश्नावर संघर्षाची भूमिका घेतली जायची. विविध योजन्यांच्या मागणीवरूनसुद्धा या भागात संघर्ष झाले होते. पाण्यासाठी तहानलेली शेती ही समस्या या भागात फार मोठ्या प्रमाणात होती.
सांगली : सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदार संघातील माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik ) यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिराळा येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. योग्य कामासाठी कोणतीही भूमिका घेणारा मतदारसंघ अशी ओळख शिराळा मतदार संघाची असल्याचं शरद पवार यांनी यावेळी सांगतिलं. स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा – सांगली जिल्हा एक असताना विशेषत: या शिराळा (Shirala, Sangli) तालुक्याचे एक आगळंवेगळं योगदान आहे. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य इतिहासामध्ये या भागातील स्वांतत्र्यसैनिकांचे योगदान खूप मोठे आहे. याच भागातून कर्तृत्ववान नेत्यांनी राज्याच्या, जिल्ह्याच्या दुष्काळी भागाच्या हितासाठी काही निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी आपण आज इथे जमलो आहोत असेही शरद पवार यावेळी आयोजित कार्यक्रमात म्हणाले.
‘शिवाजीराव नाईक स्वगृही येत आहेत’
शिराळा येथील कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, ‘ शिवाजीराव नाईक हे एक यशस्वी जिल्हा परिषद अध्यक्ष होते. त्यांच्या या यशस्वी कारकिर्दीमुळेच त्यांना देशपातळीच्या राजकारणात पाठवायचा निकाल त्यावेळच्या राज्यसरकारने केला. सहकार, पंचायत राज, शैक्षणिक, कृषी व औद्योगिक क्षेत्रात त्यांना जितकं करता येईल तेवढं करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. आज ते पुन्हा एकदा स्वगृही परत येत आहेत. मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांचं मनापासून स्वागत करतो. मी जयंतराव पाटील यांना विनंती करतो की, आपण एकदा शिवाजीरावांसोबत बैठक घेऊन त्यांच्या अनुभवाचा फायदा राज्य कारभारासाठी कसा होईल, यावर चर्चा करू. त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीचा व अनुभवाचा आपल्याला राज्यपातळीवर नक्कीच फायदा होईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
येत्या पाच वर्षात गावांची तहान भागली पाहिजे…
शिराळा मतदार संघातील गावांच्या स्थितीवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, ‘ एकेकाळी या भागात पाणी प्रश्नावर संघर्षाची भूमिका घेतली जायची. विविध योजन्यांच्या मागणीवरूनसुद्धा या भागात संघर्ष झाले होते. पाण्यासाठी तहानलेली शेती ही समस्या या भागात फार मोठ्या प्रमाणात होती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आपण सगळ्यांच्या प्रयत्नांनी बऱ्याचशा प्रश्नांची सोडवणूक या भागात झालेली आहे. मला आनंद आहे की, आजच्या या सभेमध्ये जयंतराव पाटील यांनी जवळपास 654 कोटी रूपये येथील योजनांच्या पूर्ततेसाठी देण्याचे जाहीर केले. येत्या चार – पाच वर्षांमध्ये या भागात एखाद दुसरं गाव तहानलेलं असेल असं चित्र अजिबात दिसणार नाही अशी खात्री शरद पवार यांनी व्यक्त केली.
इतर बातम्या-