कोरोनाग्रस्तांसाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या इंजेक्शनची सांगलीमध्ये निर्मिती, परवानगीनंतर महिन्याला 9 लाख डोस !
कोरोनावर इंजेक्शनच्या रुपात प्रभावी औषध शोधल्याचा दावा तयार केल्याचा दावा सांगली जिल्ह्यातल्या शिराळा येथील आयसेरा बायलॉजी या कंपनीने केलाय. (sangli isera biology corona virus patient)
सांगली : संपूर्ण जगात हाहा:कार माजवणाऱ्या कोरोनावर (corona virus) इंजेक्शनच्या रुपात प्रभावी औषध तयार केल्याचा दावा सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील आयसेरा बायोलॉजी (Isera Biology) या कंपनीने केलाय. या कंपनीने तयार केलेल्या अँटिकोविड या इंजेक्शनची प्राण्यांवरील चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. त्यानंतर कंपनीने आता इंजेक्शनची मानवी शरीरावर चाचणी करण्यासाठी आयसीएमआरकडे परवानगी मागितलीय. कंपनीच्या दाव्यानुसार सर्व प्रक्रिया आणि चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्यास अँटीकोविड इंजेक्शन कोरोना रुग्णासाठी संजीवनी ठरणार आहे. तसा दावा कंपनीने कालाय. (Sangli Isera biology invented new medicine injection to treat corona virus patient)
यापूर्वी सीरम इन्स्टिट्यूटसोबत औषध निर्मिती
गेल्या वर्षभरापासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनावर अजूनही खात्रीशीर उपचार किंवा औषध मिळालेलं नाही. मात्र आता कोरोनावर प्रभावी ठरेल असं औषध निर्माण केल्याचा दावा सांगली जिल्ह्यातील शिराळामधील आयसेरा बायोलॉजी कंपनीने केलाय. ही कंपनी पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या सीरम इन्स्टिट्यूट या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीसोबत रेबीज, सर्पदंश अशा रोगांवरील औषधांचे निर्माण करते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कोरोनावर शोधण्यात आलेल्या औषधाच्या प्राण्यांवरील चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत.
कोरोनावर औषध कसे तयार केले ?
कोरोनाला थोपवण्यासाठी या कंपनीने कोरोनाचे विषाणू घोड्याच्या शरीरामध्ये कृत्रिमरित्या टाकले. तसेच त्यानंतर या घोड्याच्या मदतीने कंपनीने प्रतिजैविके तयार केली. नंतर प्रतिजैवीके असलेल्या घोड्याच्या रक्तातून अँटिसेरा काढला. तंत्रज्ञानाच्या मदतीने सध्या या कंपनीने ‘अँटिकोविड सीरम’ चे तीन लाख डोस तयार केले आहेत. केंद्राच्या परवानगीनंतर महिन्याला 9 लाख डोस तयार करण्याची या कंपनीची तयारी आहे.
सहा महिन्यांपासून औषधावर काम सुरु
कंपनीने हे औषध तयार करण्यासाठी जवळपास मागील सहा महिन्यांपासून मेहनत घेतली आहे. कोरोनावर लस बनवणाऱ्या सीरममधील संशोधकांच्या अभ्यासाचा यासाठी उपयोग केला गेला. केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर याच औषधाचे महिल्याला 9 लाख डोस तयार करण्यात येतील. इंजेक्शनच्या रुपात हे औषध रुग्णांना देण्यात येईल. कोरोनाच्या कोणत्याही स्टेनवर हे इंजेक्शन उपयुक्त ठरेल असा दावा कंपनीने केलाय.
दरम्यान, आयसेराने तयार केलेल्या इंजेक्शनची प्राण्यांवरील चाचणी यशस्वी झाली असली तरी मानवी शरीरावर प्रयोग करण्यासाठी आयसीएमआरची परवानगी आवश्यक आहे. त्यासाठीची प्रक्रिया नुकतीच सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनीदेखील शासनस्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. येत्या काही दिवसात या परवाणग्या पूर्ण करून हे इंजेक्शन बाजारात येईल असा विश्वास व्यक्त केला जातोय.
इतर बातम्या :
(Sangli Isera biology invented new medicine injection to treat coronavirus patient)