Video : नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात कृष्णेचं पाणी शिरलं, श्रीची उत्सवमूर्ती दर्शनासाठी नारायणस्वामी मठात
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरातही पुराचं पाणी शिरलं. आज दुपारी 2 वाजता दत्ताच्या पादुकावर कृष्णेचं पाणी उत्तर द्वारातून जात दक्षिणदारातून बाहेर पडल्यानं चालू मोसमातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला.
सांगली : राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. अशावेळी शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी दत्त मंदिरात पाणी शिरलं आहे. शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत 24 तासांत झपाट्यानं वाढ झाली आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरातही पुराचं पाणी शिरलं. आज दुपारी 2 वाजता दत्ताच्या पादुकावर कृष्णेचं पाणी उत्तर द्वारातून जात दक्षिणदारातून बाहेर पडल्यानं चालू मोसमातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. (Water of Krishna river infiltrated in the Datta temple of Nrusinhwadi)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दत्त मंदिर दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे मोजक्या पुजारी मंडळी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. मंदिरात पाणी आल्याने श्रीची उत्सव मूर्ती दर्शनासाठी नारायणस्वामी मठात ठेवण्यात आली आहे. देवस्थानच्या वतीनं मंदिरातील साहित्य सूरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं. मुसळधार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत 24 तासात झपाट्याने वाढ झाली आहे.
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात पुराचं पाणी आलं. आज दुपारी दोन वाजता श्रीच्या पादुकावर कृष्णेचं पाणी उत्तर द्वारातून जात दक्षिणदारातून बाहेर पडल्याने चालू मोसमातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दत्त मंदिर दर्शनासाठी बंद असल्यानं मोजक्या पुजारी मंडळी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला आहे. मंदिरात पाणी आल्याने श्रीची उत्सव मूर्ती दर्शनासाठी नारायणस्वामी मठात ठेवण्यात आली आहे. देवस्थानच्या वतीनं मंदिरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या :
घरात पाणी शिरल्याने सुरक्षेसाठी घराबाहेर पडले, पाण्याचा अंदाज न आल्याने बाप-लेक नदीत वाहून गेले
Water of Krishna river infiltrated in the Datta temple of Nrusinhwadi