सांगलीत परप्रांतियांचा हैदोस, सिगरेट न दिल्याने दुकानदाराची स्विफ्ट पेटवली, दुकानाची तोडफोड
सांगली जिल्ह्यातील पाटगाव येथील एका किराणा माल दुकानदारावर परप्रांतिय कामगारांच्या (Sangli shopkeeper beaten up by migrant workers) जमावाने हल्ला केला.
सांगली : सांगली जिल्ह्यातील पाटगाव येथील एका किराणा माल दुकानदारावर परप्रांतिय कामगारांच्या (Sangli shopkeeper beaten up by migrant workers) जमावाने हल्ला केला. यावेळी दुकानाची तोडफोड करुन एक स्विफ्ट गाडी पेटवण्यात आली. हल्लेखोरांनी तीन मोटारसायकलीचीही तोडफोड करुन दुकानदाराला मारहाण केली.
या प्रकरणी दोन परप्रांतिय संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर सात जणांविरोधात मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व दिलीप बिडकोन कंपनीतील सर्व कामगार असून, रात्री दुकानात येऊन त्यांनी सिगरेटची मागणी केली. दुकानदाराने सिगरेट नाही असं सांगितल्यावर चिडून या परप्रांतिय कामगारांनी दुकानावर हल्ला करुन दुकानाची नासधूस केली. इतकंच नाही तर दुकानदारांची स्विफ्ट गाडी पेटवली.
याप्रकरणी अटक केलेले आरोपी कन्हैयाकुमार आणि रुपेंद्रसिंह तोमर हे दोघे मूळ मध्य प्रदेश येथील असून सध्या ते दिलीप बिडकोन रोड कंस्ट्रक्शन वर्क या कंपनीमध्ये कामास आहेत. कन्हैयाकुमार हा या कंपनीत एच आर मॅनेजर या पदावर आहे.
(Sangli shopkeeper beaten up by migrant workers)