‘शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत’, संजय मंडलिक यांचं वादग्रस्त वक्तव्य

"मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मरायाची नाही. मग ती कुस्ती कशी होणार? आता जे महाराज साहेब आहेत ते कोल्हापूरचे आहेत का? खरे वारसदार आहेत का? ते सुद्धा दत्तकच आले आहेत. ते खरे वारसदार नाहीत", असं वक्तव्य शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केलं आहे. त्यांच्या वक्तव्यावर आता विरोधकांकडून टीका केली जात आहे.

'शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत', संजय मंडलिक यांचं वादग्रस्त वक्तव्य
शाहू महाराज छत्रपती आणि संजय मंडलिक यांचा फोटो
Follow us
| Updated on: Apr 11, 2024 | 5:01 PM

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे, असं वादग्रस्त वक्तव्य संजय मंडलिक यांनी केलं आहे. माझे वडील सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थानं पूर्वगामी विचार जपला. मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मारायची नाही. मग ती कुस्ती कशी होणार? असा सवाल संजय मंडलिक यांनी केला. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत खासदार संजय मंडलिक यांनी संबंधित वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकारण तापू लागलं आहे.

संजय मंडलिक नेमकं काय म्हणाले?

“मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मरायाची नाही. मग ती कुस्ती कशी होणार? आता जे महाराज साहेब आहेत ते कोल्हापूरचे आहेत का? खरे वारसदार आहेत का? ते सुद्धा दत्तकच आले आहेत. ते खरे वारसदार नाहीत. खरे वारसदार तुम्ही, आम्ही आहोत. शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार आपण जपले. ही भूमी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आहे. शाहू महाराजांची आपल्याला पुरोगामी विचार शिकवला. समतेचा विचार शिकवला. या हवेत, पाण्यात गुण आहेत की या जिल्ह्यातील नागरिकांना जन्मत: शाहू विचार आहेत”, असं संजय मंडलिक म्हणाले.

मंडलिक यांच्या विधानावर भाजपची प्रतिक्रिया काय?

संजय मंडलिक यांच्या विधानावर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. “संजय मंडलिक यांचा हेतू हा छत्रपती घराण्याचा अपमान करण्याचा नक्कीच नसावा. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती वंशाचा पुरावा मागितला होता हे विसरलात का? भाजपने छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभा दिली तेव्हा स्वत: शरद पवारांचं वक्तव्य वादग्रस्त नव्हतं का? आधी छत्रपती हे पेशव्यांची नेमणूक करायचे आणि आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करत आहेत. हा छत्रपती घराण्याचा पवारांनी केलेला अपमान होता ना? तेव्हा उगाच राजकीय विषय नसल्याने अशा विषयांना मोठ करण्याचा हेतू आहे”, अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली.

‘कोल्हापूरकर हे अजिबात सहन करणार नाहीत’

काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “स्वाभिमानी माणसं निश्चितपणे कोल्हापुरी बाणा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. त्यांच्या पायाखालची वाळू खाली घसरत चालली आहे. निवडणूक हातातून जात असल्याचं त्यांना दिसत आहे. म्हणून एक वेगळ्या दिशेला निवडणूक घेऊन जायचा त्यांचा प्रयत्न आहे. पण ते यशस्वी होणार नाहीत. कोल्हापूरकरांना हे अजिबात पटलेलं नाही. कोल्हापूरकर हे अजिबात सहन करणार नाहीत. निवडणूक एका बाजूला. पण आम्ही कोल्हापूरकर म्हणून कदापि हे सहन करणार नाही. शाहूप्रेमी निश्चितच त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतील”, अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.