संजय राठोड दोन तासात पोहरादेवीत; वाचा, सकाळपासून नेमकं काय काय घडलं!

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नंतर वन मंत्री संजय राठोड पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. (sanjay rathod at poharadevi, know about his visit details)

संजय राठोड दोन तासात पोहरादेवीत; वाचा, सकाळपासून नेमकं काय काय घडलं!
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 1:33 PM

वाशिम: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नंतर वन मंत्री संजय राठोड पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. आज त्यांनी पोहरादेवी येथे सहकुटुंब जगदंबा मातेचं दर्शन घेतलं. त्यानंतर सेवालाल महाराजांचंही दर्शन घेतलं. आज दिवसभरात राठोड यांनी काय काय केलं याचा घेतलेला हा आढावा. (sanjay rathod at poharadevi, know about his visit details)

सकाळी 10 वाजताच शिवसेना नेत्यांची हजेरी

सकाळी 10 वाजता शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, माजी आमदार विश्वास नांदेकर, राठोड यांचे मेव्हणे सचिन नाईक आणि त्यांचे नातेवाईक आज राठोड यांच्या निवासस्थानी दाखल झाले. शिवसेना नेत्यांनी सुमारे अर्धा पाऊण तास राठोड यांच्याशी चर्चा केली.

10 वाजून 50 मिनिटाला निघाले

त्यानंतर राठोड हे पत्नी शितल यांच्यासह 10 वाजून 50 मिनिटाला पोहरादेवीकडे निघाले. यावेळी त्यांच्यासोबत 20 हून अधिक वाहनांचा ताफा होता. विशेष म्हणजे राठोड यांनी शासकीय ऐवजी खासगी वाहनाने प्रवास केला.

Sanjay Rathod

संजय राठोड,वनमंत्री

15 मिनिटं दिग्रसममध्ये

त्यानंतर राठोड यांचा ताफा दिग्रस येथील शासकीय निवासस्थानी आले. या ठिकाणी ते 15 मिनिटे थांबले. या ठिकाणी फ्रेश झाल्यानंतर त्यांचा ताफा पुन्हा पोहरादेवीकडे निघाला.

Sanjay Rathod Visit pohradevi

12 वाजून 40 मिनिटाला पोहरादेवीत

यवतमाळ ते पोहरादेवी हे 80 किलोमीटरचे अंतर कापत राठोड पोहरादेवीत दाखल झाले. 12 वाजून 40 मिनिटाला ते पोहरादेवीत पोहचले. यावेळी प्रचंड गर्दी झाल्याने त्यांना मार्गक्रमण करण्यात अडचण येत होती. कार्यकर्त्यांची रेटारेटी सुरू झाल्याने पोलिसांना जमावावर लाठीमार करावा लागला.

12.55 वाजता देवीचे दर्शन

त्यानंतर 12 वाजून 55 मिनिटांनी राठोड यांनी पत्नीसोबत जगदंबा मातेच्या गाभाऱ्यात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. शितल राठोड यांनी यावेळी देवीची खणा-नारळाने ओटी भरली.

1 वाजून 4 मिनिटांनी सेवालाल महाराजांच दर्शन

त्यानंतर राठोड यांनी 1 वाजून 4 मिनिटांनी त्यांनी सेवालाल महाराजांचं दर्शन घेतलं. या संपूर्ण परिसरात राठोड यांनी पायी चालत दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत महंत उपस्थित होते.

1 वाजून 15 मिनिटांनी रामराव बाबांच्या समाधीकडे

त्यानंतर राठोड यांनी 1 वाजून 15 मिनिटांनी रामरावबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी गर्दीतून वाट काढत जाताना त्यांना अडचणी येत होत्या. (sanjay rathod at poharadevi, know about his visit details)

हजारोंची गर्दी, लोक घरांवर, झाडावर चढले

राठोड येणार म्हटल्यावर पोहरादेवी मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती. या परिसरात पाय ठेवायलाही जागा नव्हती. त्यामुळे अनेक लोक घरांवर आणि झाडांवर चढले होते. तर अनेक समर्थकांनी राठोड यांचा फोटो असलेले फलक हातात घेऊन ते उंचावले होते. राठोड यांनीही या समर्थकांना हात उंचावून अभिवादन केलं. त्यामुळे राठोड समर्थकांनी पुन्हा एकदा जोरदार घोषणाबाजी केली. (sanjay rathod at poharadevi, know about his visit details)

संबंधित बातम्या:

जनतेची फसवणूक कराल, पण मंदिरातील देवाचे काय?; भाजपचा संजय राठोडांना सवाल

शक्तीप्रदर्शन नाही, हे तर राठोडांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आव्हान; सुधीर मुनगंटीवार यांचा हल्लाबोल

संजय राठोड जगदंबा मातेच्या मंदिरात; पोहरादेवीत प्रचंड गर्दी, पोलिसांचा लाठीमार

(sanjay rathod at poharadevi, know about his visit details)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.