संजय राठोड नॉटरिचेबल, पण वन मंत्रालयाचं कामकाज सुरू

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांनी थेट वन मंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन त्यांच्यावर आरोप केले. (sanjay rathod will appear today in cabinet meeting?)

संजय राठोड नॉटरिचेबल, पण वन मंत्रालयाचं कामकाज सुरू
संजय राठोड, वनमंत्री
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 1:50 PM

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांनी थेट वन मंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन त्यांच्यावर आरोप केले. तेव्हापासून गेले पाच दिवस संजय राठोड नॉट रिचेबल आहेत. मात्र, आज मंत्रालयात त्यांच्या कार्यालयातील प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू आहे. त्यामुळे राठोड हे अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (sanjay rathod will appear today in cabinet meeting?)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यापासून संजय राठोड गायब आहेत. त्यांनी या प्रकरणावर अद्याप खुलासा केला नाही. त्यांची बाजूही मांडली नाही. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली असताना काल त्यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चाही होती. त्यांनी राजीनाम्याचं वृत्तही स्वीकारलं नाही आणि फेटाळलंही नाही. तसेच यवतमाळ आणि मुंबईतील घरीही ते नाहीत. त्यामुळे राठोड नेमके गेले कुठे असा सवाल केला जात आहे. गेल्या पाच दिवसांपासून ते मंत्रालयातही आले नाहीत. मात्र आज राठोड यांच्या मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर प्रशासकीय कामकाज नियमित सुरू आहे. त्यामुळे राठोड हे अधिकाऱ्यांच्या संपर्कात असावेत असं सांगितलं जात आहे.

कॅबिनेटला उपस्थित राहणार?

संजय राठोड गेल्या पाच दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. पण त्यांच्या कार्यालयातील प्रशासकीय कामकाज सुरू असल्याने आजच्या सह्याद्री अतिथी गृहातील कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आघाडीच्या आमदारांशी संवाद साधला होता. या बैठकीलाही राठोड उपस्थित राहिले नव्हते. पण आज कॅबिनेट असल्याने ते उपस्थित राहणार की नाही? असा सवाल केला जात आहे.

दोघे ताब्यात

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर 11 दिवसानंतर पोलिसांनी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पण हे दोघे कथित व्हायरल क्लिपमधील विलास आणि अरुण राठोड आहेत का? हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. आम्हाला ज्यांच्या ज्यांच्यावर संशय आहे, अशा लोकांचा आम्ही तपास करू शकतो, असं पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे पोलिसांनी अटक केलेले नेमके कोण आहेत? याचं कुतुहूल वाढलं आहे. तसेच ऑडिओ क्लिपमधील हे दोघे नसतील तर अरुण राठोड आणि विलास कुठे आहेत? असा सवालही केला जात आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

मुळची परळीची असलेली 22 वर्षाची पूजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री दीड वाजता तिनं सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पूजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पूजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही. (sanjay rathod will appear today in cabinet meeting?)

संबंधित बातम्या:

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राऊत बोलले, पण…

पूजा चव्हाणचा मृत्यू नेमका कशाने झाला? वाचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

(sanjay rathod will appear today in cabinet meeting?)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.