संजय राऊतांची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पूर्ण, ह्रदयात बसवले दोन स्टेन

काही वेळापूर्वीच ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी दोन स्टेन त्यांच्या ह्रदयात टाकण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

संजय राऊतांची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पूर्ण, ह्रदयात बसवले दोन स्टेन
Follow us
| Updated on: Dec 03, 2020 | 8:07 PM

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर आज लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही वेळापूर्वीच ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी दोन स्टेन त्यांच्या ह्रदयात टाकण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. खरतंर, गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अँजिओप्लास्टीवेळी एकूण तीन स्टेन टाकण्यात आले होते. यातील एक स्टेन खराब झाल्यामुळे आता पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. (Sanjay Raut angioplasty surgery done in lilavati two stents implanted in his heart)

अधिक माहितीनुसार, डॉक्टरांनी तो स्टेन काढून त्याजागी नवा स्टेन टाकला आहे. आज अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेत एकूण 2 स्टेन टाकण्यात आले. डॉ. मॅथ्यू आणि डॉ अजित मेनन यांनी ही शस्त्रक्रिया केली. तर शस्त्रक्रियेनंतर संजय राऊत यांची प्रकृती स्थिर असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलंआहे. तर सध्या ते ICU मध्ये आहेत. त्यांना उद्या दुपारी ICU तून नॉर्मल वॉर्डमध्ये आणण्यात येणार आहे.

आणखी तीन ते चार दिवस संजय राऊत हे डॉक्टरांच्या देखरेखीखाली लीलालवी रुग्णलायात राहाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांच्यावर हृदयात दोन स्टेन घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर आणखी स्टेन टाकावे लागणार होते. त्यासाठी एप्रिल 2020 ही नियोजित वेळ होती. पण कोव्हिड प्रादुर्भावामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

डॉ मॅथ्यू हे प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ आहेत. डॉ. अजित मेनन हे सुद्धा मुंबईस्थित हृदयविकार तज्ज्ञ आहेत. यापूर्वीही डॉ. मॅथ्यू आणि डॉ. मेनन यांनीच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली होती.

राऊतांच्या हृदयात गेल्या वर्षी दोन ब्लॉकेज

संजय राऊत यांच्या हृदयात दोन ब्लॉकेजस आढळले होते. संजय राऊत हे 11 नोव्हेंबर 2019 रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. लीलावती रुग्णालयात त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांच्या हृदयात दोन ब्लॉकेजस असल्याचं आढळलं. त्यामुळे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. लीलावती रुग्णालयात डॉ. मॅथ्यू यांनीच संजय राऊतांची अँजिओप्लास्टी केली होती. (Sanjay Raut angioplasty surgery done in lilavati two stents implanted in his heart)

इतर बातम्या –

योगी आदित्यनाथ यांनी फक्त मुंबईशीच पंगा घेतलाय का?; संजय राऊतांचा सवाल

शरद पवार यांच्या भेटीसाठी संजय राऊत ‘सिल्व्हर ओक’वर, दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा

(Sanjay Raut angioplasty surgery done in lilavati two stents implanted in his heart)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.