नागपूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (shridhar patankar) यांच्या मालमत्तांवर ईडीने (ed) कारवाई केल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपमध्ये सर्वच चांगले आहेत का? असा एकही व्यक्ती भाजपमध्ये नाहीये का? भाजप नेते रस्त्यावर हातात कटोरा घेऊन भीक मागत आहेत का? सर्वच रस्त्यावर बसून भीक मागत आहेत का? कुणी चने विकतंय, कुणी भेळपुरी विकतंय, कुणी पावभाजींची गाडी लावून जगत आहेत असं काही आहे का?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. तुमच्याकडे काय आहे. तुम्ही जे शकडो हजारो कोटी खर्च करून निवडणुका लढत आहात तो पैसा कुठून येतो. तुमचे इमले, बंगले कसे उभे राहिले. आम्ही दिलेले कागदपत्रे पुरावे ठरत नाहीत, पण तुमचे चिटोरे पुरावे ठरतात. हा न्याय नाही. परत परत सांगतो, घाई नाही. पण सर्व समोर येईल. मोकळेपणाने श्वास घेण्याच्या स्वातंत्र्यावरचं हे संकट आहे. पण हे काही काळच राहणार, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
संजय राऊत यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. महाराष्ट्राचं राजकारण तापलं असं वाटत नाही. ईडीने दोनचार ठिकाणी काय कारवाया केल्या म्हणून राजकारण तापत नाही. दिल्लीत ईडीचं हेड क्वॉर्टर आहे. पण पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात भाजप विरोधी सरकार आल्याने ईडीचं हेड क्वॉर्टर महाराष्ट्र आणि बंगालमध्ये आलं आहे. या ना त्या कारणाने विरोधकांना त्रास देण्यासाठी हे सर्व सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्या कुटुंबाला नाहक त्रास देत आहेत. महाराष्ट्रातही हा त्रास सुरू आहे, असा हल्ला राऊत यांनीन चढवला.
आम्ही पंतप्रधान कार्यालयात आणि ईडीकडे सर्व पुरावे दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयातून मला पोचपावती मिळाली आहे. मात्र, आमच्या पुराव्यांकडे कुणाचं लक्ष नाही. केवळ सिलेक्टेड कारवाई सुरू आहे. काल पाटणकरांवर कारवाई केली. त्या कारवाई मागचं सत्य काही तज्ज्ञ मंडळींनी समजून घ्यावं. हे नीट समजून घ्या. चुकीच्या माहितीवर आधारीत काही गोष्टी प्रसारीत केल्या जात आहेत. हळूहळू त्या गोष्टी बाहेर येतील. ही आमच्याविरोधातील बदनामीची मोहीम आहे. हीच मोहीम उद्या त्यांच्यावर उलटल्या शिवाय राहणार नाही. मी पूर्ण विश्वासाने सांगतो आत्मविश्वासाने सांगतो हे तुमच्यावर उलटणार आहे, असा इशाराही त्यांनी दिलं.
यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही टीका केली. सोमय्यांना काहीही बोलू देत. त्यांच्या बोलण्याला कोण विचारतं. ते काहीही बोलतात. हवाला किंगशी भाजपचे काय संबंध आहेत याचे पुरावे पंतप्रधान कार्यालयाला दिलेत ना. त्यापुराव्याबाबत मला पोचपावती आले आहे. त्यावर करतंय का ईडी कारवाया? भाजपच्या घोटाळ्यावर सोमय्या बोलले का? सोमय्यांनी ज्या नेत्यांविरोधात ईडीकडे कारवाईची मागणी केली, ज्या नेत्यांना तुरुंगात पाठवण्याची मागणी केली, ते भाजपमध्ये गेले. त्यानंतर सोमय्यांची वाचा गेली. अशा माणसावर काय विश्वास ठेवायचा? असा सवालही त्यांनी केला.
संबंधित बातम्या:
मनसेचा दोन वर्षानंतर मुंबईत पाडवा मेळावा; Raj Thackeray पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार?
Maharashtra News Live Update : कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल
Somaiya on Thackeray | ठाकरे परिवाराचं हे पहिलंच मनी लॉन्ड्रिंगचं काम की…सोमय्यांचा तिखट सवाल