AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यातला महिलेवरचा हल्ला मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच! फडणवीस ठाण्याचे गृहमंत्री नाहीत का? संजय राऊत यांचा संताप

ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेली मारहाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच आदेशावरून झाली, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.

ठाण्यातला महिलेवरचा हल्ला मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच! फडणवीस ठाण्याचे गृहमंत्री नाहीत का? संजय राऊत यांचा संताप
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 10:52 AM

नवी दिल्ली : ठाण्यातील एका ठाकरे गटाच्या निःशस्त्र महिलेवर 100 महिला येऊन हल्ला करतात, ही हिंमत कुणामुळे येते? देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे ठाण्याचे गृहमंत्री आहेत की नाही? ठाण्यात काल घडलेला राडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याच आदेशावरून झाला, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. हा सगळा प्रकार घडत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेतात, ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी बांगड्या भरल्यात का? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केलाय. नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी ठाण्यातील प्रकाराबाबत संताप व्यक्त केला.

ठाण्यात काय घडलं?

ठाण्यात काल ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झालाय ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी बेदम मारहाण केली. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने फेसबुक पोस्ट टाकल्याच्या रागातून ही मारहाण झाल्याचं म्हटलं जातंय. सदर महिलेवर अति दक्षता विभागात उपाचर सुरु आहेत. ठाण्यात कासर वडवली येथे हा प्रकार घडला.

मुख्यमंत्र्यांचा दबाव?

सोशल मीडियावर शिंदे गटाच्या एक महिलेनी पोस्ट केली होती. त्यावर ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांनी वादग्रस्त कमेंट केली. कमेंट केल्यावर रोशनी शिंदे यांनी माफीही मागितली तरी कमेंटमुळे नाराज शिंदे गटाच्या काही महिलांनी रोशनी शिंदे या महिलेची मारहाण केली. ठाकरे गटाची महिलांचा आरोप आहे की रोशनी शिंदेच्या मारहाण केल्यानंतर कासार वडवली पोलीस लेखी तक्रार घेतली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पोलीसांनी गुन्हा नोंद केला नाही. त्यामुळे पोलीस ठाण्या समोर ठिय्या काल ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं.

संजय राऊत संतापले

ठाण्यातला कासारवडवली येथे झालेला राडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच आदेशाने झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून संजय राऊत म्हणाले, ‘ ठाण्यातल्या बाजारबुणग्यांना आवरा. मनगटात रक्त असेल तर तिथे कारवाई करा. ठाण्यात एका महिलेवर १०० महिला येऊन हल्ला करतात. पोलीस आयुक्तांनी बांगड्या भरल्यात का? मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच हे होत आहे. महाराष्ट्रात आम्ही त्यांना पुरून उरलो आहोत. पोलीस यंत्रणा त्यांची गुलाम आहे. जे बघ्याची भूमिका घेतायत , त्यांना सांगतो, ठाण्यात आम्हालाही घुसता येतं. आम्ही आलो तर ठाण्यात यांना घरात स्वतःला कोंडून घ्यावं लागेल, अशा इशारा राऊत यांनी दिलाय.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.