महाविकास आघाडीत बिघाडी, सांगलीत काँग्रेस, राष्ट्रवादीने काम केले नाही… संजय राऊत यांचा आरोप

Sanjay Raut: मुख्यमंत्री येऊन गेले. ते कशासाठी येतात हे माहिती आहे. शेअर बाजाराप्रमाणे भाव लावला जातो. शिक्षकांना विकत घेऊ नका. परंपरा मोडू नाका, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीत बिघाडी, सांगलीत काँग्रेस, राष्ट्रवादीने काम केले नाही... संजय राऊत यांचा आरोप
sanjay raut
Follow us
| Updated on: Jun 23, 2024 | 12:06 PM

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. या यशानंतर महाविकास आघाडीत शरद पवार आक्रमक झाले आहे. महाविकास आघाडीत आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे. आम्ही जास्त जागा लढवयला हव्या होत्या, परंतु महाविकास आघाडीत बिघाड होऊ नये, म्हणून दोन पावले मागे आलो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यांना शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले की, शरद पवार यांचा स्ट्राईक जास्त हे खरे आहे. पण सांगलीच्या जागी काँग्रेसने काम केले नाही. या जागेवर राष्ट्रवादीने काम केले नाही. दुसरीकडे केंद्र सरकारने सगळ्यात जास्त आम्हाला टार्गेट केले. त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवारांना बसला, असे संजय राऊत यांनी म्हटले. शरद पवार विधान सभेसाठी जास्त जागा म्हणजे किती घेतील? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सीएम यांच्या स्ट्राईक रेटवर हल्ला

संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, एकनाथ शिंदे म्हणतात, त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे. परंतु त्यांचा बेईमानीचा स्ट्राईक रेट चांगला आहे. त्यांचा थैल्या आणि खोकेचा स्ट्राईक रेट जास्त आहे. त्यांनी पैशाने स्ट्राईक रेट घेतला आहे. त्यांनी मुंबईची जागा लुटली. महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा अजून सुरू झाली नाही. त्यासंदर्भात बैठक ठरलेली होती. परंतु काँग्रेसची दिल्लीत बैठक आहे. यामुळे बैठकीसाठी पुढली तारीख ठरवू.

फसवणूक करुन मत घेतली जाताय…

विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाची निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक दौरा केला. त्यावर संजय राऊत यांनी टीका केली. मुख्यमंत्री येऊन गेले. ते कशासाठी येतात हे माहिती आहे. शेअर बाजाराप्रमाणे भाव लावला जातो. शिक्षकांना विकत घेऊ नका. परंपरा मोडू नाका, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पैसे वाटपाचा व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी ट्विट केला. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, हेलिकॉप्टरमध्ये 20 कोटी उतरवले हे सगळ्यांनी पाहिले. पदवीधर शिक्षक या वर्गात बाजारात ओढू नका. उघड्या डोळ्यांनी व्यभिचार पाहता आहे. लोकशाहीची हत्या होत आहे. निवडणूक आयोग धृतराष्ट्र प्रमाणे हे सर्व पाहत आहे. दिंडोरीत भगरे नावाचा उमेदवार उभा केला. भास्कर भगरे यांच्या नावाप्रमाणे हा उमेदवार दिला. त्याला पिपाणी चिन्ह दिले. लोकांना फसवणूक करुन मत घेतले जात आहे.

हे सुद्धा वाचा

डमी उमेदवार पद्धत बंद करा

डमी उमेदवार पद्धत बंद व्हायला पाहिजे. लोकांना भ्रमित केले जाते आणि मते घेतली जातात. यातून मार्ग काढावा लागेल. संदीप गुळवे यांना मत द्यायचे तर डुप्लिकेटला दिले जाते. आदिवासी आणि शेतकरी वर्ग चुकतो. लोकसभा निवडणुकीत लोकांनी शिवसेना समजून धनुष्यबाणला मत दिली होती. त्यांना उद्धव ठाकरे यांना मत द्यायचे होते, असे संजय राऊत यांनी म्हटले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.