शिवसेना खासदार संजय राऊत शिवसेना भवनात (Shiv sena Bhavan, Dadar) आज पत्रकार परिषद घेणार आहेत. संपूर्ण राज्याचं लक्ष शिवसेनेच्या आजच्या शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेकडे (Press conference of Sanjay Raut) लागलं आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय राऊत हे महत्त्वपूर्ण गौप्यस्फोट करण्याची शक्यताय. आता शिवसेनेच्या आजच्या पत्रकार परिषदेतून काय खळबळजनक खुलासे केले जातात, याकडे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची नजर लागली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचंही राऊतांनी म्हटलं होतं. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेसह राजकीय घडामोडी महत्त्वपूर्ण ठरणार असून, जाणून घेऊयात यांच संदर्भातले ताजे आणि वेगवान अपडेट्स, आज त्यांनी भाजप नेते आणि ईडीला इशारा दिला आहे.
पुढच्या पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांची नावं घेऊन सांगणार
काहीही करा महाराष्ट्रात मविआचं सरकार राहणार
महान महात्मा किरीट सोमैया सर्वांचे भ्रष्टाचार बाहेर काढतात
सोमैय्यांचे वाधवानसोबत आर्थिक संबंध काय ?
वाधनवानला बँक घोटाळ्यात ब्लॅकमेल करुन पैसे घेतले
वाधवान आरोपी असताना त्याच्यासोबत व्यवहार कसा केला
किरीट आणि नील सोमैया जेलमध्ये जाणार
2017 मध्ये ईडीनं दिवाण हाऊसिंग फायन्सासची चौकशी सुरु केली
जितेंद्र नवलानीच्या खात्यात 25 कोटी ट्रान्सफर झाले
मग 31 मार्च 2020 पर्यंत वाधवानच्या कंपनीकडून नवलानीच्या कंपनीला पैसे गेले
अविनाश भोसलेंची चौकशी झाली
मग भोसलेंकडून 10 कोटी ट्रान्सफर केले नवलानीला
नवलानीच्या सात कंपनीन कोट्यवधी रुपये ट्रान्सफर केले गेले
या पैशांनी परदेशात बेनामी संपत्ती खरेदी केली जाते
मुंबई पोलिसात आज मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे
मुंबई पोलिस खंडणीचा तपास करीत आहेत
ईडी काही अधिकारी तुरुंगात जातील
वसुली एजंटमध्ये भाजपच्या मंत्र्यांचीही समावेश
ईडीच्या एजंटचे नेटवर्क वसुलीच्या मागे लागलंय
त्याची विस्तृत माहिती मी पंतप्रधानांना देणार
ईडीचे अधिकारी बिल्डर्स, कॉर्पोरेटर्सना धमकावत आहेत
ज्या ज्या कंपनीची ईडीने चौकशी केली त्या कंपन्यांनी जितेंद्र नवलानी यांच्या खात्यावर पैसे पाठवले
जितेंद्र नवलानी हे ईडीचे वरिष्ठ अधिकारी
शिवसेना मोठा खुलासा करणार
दूधवाल्याकडे 8 हजार कोटींची संपत्ती कुठून आली
ईडीला या लोकांची संपत्ती दिसत नाही का
दिल्ली, महाराष्ट्र नेत्यांच्या
पंतप्रधान मोदींकडे पुरावे सादर करणार
सोमैय्या हे ईडीचे वसुली एजंट
ईडी आणि ईडीचे काही अधिकारी भाजपची एटीएम मशिन बनली आहे
ईडीच्या अधिकाऱ्यांना भाजपकडून तिकिट
संजय राऊत पत्रकार परिषद
आज मुंबईत धाडीवर धाडी सुरु
आम्ही सुद्धा धाडी टाकण्याचा विचार केला
सध्या आयटीची भानामती सुरु आहे
शिवसनेनेला त्रास देण्यासाठी धाडी सुरु
पालिका निवडणुकीपर्यंत धाडी सुरुच राहतील
इनकम टॅक्स आणि ईडीला आतापर्यंत 50 नावं दिली
केंद्रिय तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार
केंद्रिय मंत्र्यांविरोधात किरीट सोमैय्यांनीच पुरावे दिले
केंद्रीय यंत्रणा त्या मंत्र्यांच्या घरावर धाडी का टाकत नाही?
मुंबई
संजय राऊत पत्रकार परिषद
राऊतांच्या दुसऱ्या पत्रकार परिषदेच्या आधी पहिल्या पत्रकार परिषदेप्रमाणे शिवसैनिकांचं शक्तीप्रदर्शन नाही
मात्र महत्त्वाचे शिवसैनिक आणि कार्यकर्ते शिवसेना भवनात दाखल