राजकारणात कोणतीही भविष्यवाणी बदलू शकते, राऊतांच्या विधानावर pankaja munde यांची सूचक प्रतिक्रिया
राजकारणात कधीही कोणतीही भविष्यवाणी बदलू शकते असं माझं मत आहे, असं सूचक विधान भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी केलं. त्या बीड (beed) येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होत्या. शिवसेना नेते संजय राऊत यांनी नागपुरात युतीबाबतचं मोठं विधान केलं होतं.
बीड: संजय राऊत (sanjay raut) यांनी युतीबाबत केलेल्या विधानावर मी टिप्पणी करू शकणार नाही. पण त्यांच्या भावनेला पक्षातील पक्षाध्यक्ष आणि पक्षातील निर्णय घेणारे इतर नेतेच उत्तर देतील, असं सांगतानाच राजकारणात कधीही कोणतीही भविष्यवाणी बदलू शकते असं माझं मत आहे, असं सूचक विधान भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी केलं. त्या बीड (beed) येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होत्या. शिवसेना नेते संजय राऊत यांनी नागपुरात युतीबाबतचं मोठं विधान केलं होतं. भविष्यात शिवसेना-भाजप एकत्र येणार नाही. एखाद्या भूमिकेवरून शिवसेना माघार घेणार नाही, असं राऊत म्हणाले होते. त्यावर पंकजा मुंडे यांनी हे विधान केलं आहे. या मेळाव्यात त्यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही जोरदार टीका केली. बीडच्या मुद्द्यावरून माझी कशाला बदनामी करता? असा सवालच त्यांनी धनंजय मुंडे यांना केला.
पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज किल्ले धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदाम इमारतीचे उद्घाटन संपन्न झाले. यानिमित्ताने विकास कामांचे उदघाटन, विविध परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शेतकरी मेळाव्यास त्यांनी संबोधित केले. राजकारणात वैयक्तिक वैर नसावे. हे नवीन पिढी शिकली नाही. एखाद्यावर चौकशी लावू शकतो, पण असा नेता राजकारणात दीर्घकाळ टिकत नाही, असं सांगत पंकजा मुंडे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री, दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचं कार्याचं कौतुक केलं.
राजकारणात सर्कस सुरू
महाराष्ट्रातील विद्यार्थी हे यशवंतरावांचे देणे लागतात. आज राज्यात गुणांची खाण असणाऱ्या नेत्यांची संख्या कमी आहे. भविष्यात दुर्गुणांची खाण असलेले नेतेच महत्त्वाचे वाटतील. युद्ध जिंकणे आणि हारणे हे खरे राजकारण नाही. लोकांची मने जिंकली पाहिजेत. सध्या राजकारणात सर्कस सुरू पाहायला मिळतेय. राज्य करताना सात्विकपणे केलं पाहिजे आणि युद्ध करताना पराक्रमाने केले पाहिजे, असं त्या म्हणाल्या.
माझा संघर्ष प्रवृत्ती बदलण्यासाठी
महिला सत्संगाला जातात. मी पण सत्संग ऐकते. मी रामकथा ऐकल्या. त्यात चांगल्या लोकांना त्रास होतो. ज्याला वनवास, त्रास आहे, त्यालाच इतिहास रचायला मिळतो. माझा संघर्ष स्वतःसाठी नव्हता केवळ प्रवृत्ती बदलण्यासाठी होता. मोदींच्या नेतृत्त्वात सायकलवरुन जाणाऱ्या नेत्यांना मंत्री केले. मी जिल्हा परिषद एवढी मोठी केली पण एकतर काम आजच्या सत्ताधाऱ्यांनी केले का?, असा टोला त्यांनी धनंजय मुंडे यांना लगावला.
किल्ले धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदाम इमारतीचे उदघाटन आज माझ्या हस्ते संपन्न झाले. यानिमित्ताने विकास कामांचे उदघाटन, विविध परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शेतकरी मेळाव्यास संबोधित केले. #धारूर pic.twitter.com/9gzGyoqKRT
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) March 22, 2022
संबंधित बातम्या:
Ajit Pawar : व्यापाऱ्यांना ‘अभय’, 10 हजार रुपयांची थकबाकी माफ; राज्य सरकारचा मोठा निर्णय