मुंबई : आजच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आणि केसीआर (Kcr) यांच्या भेटीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं होते. सकाळपासून या भेटीने राजकारणातला सस्पेन्स वाढवला होता. मात्र काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री आणि राव यांनी पत्रकार परिषदेत घेत चित्र उघड केले. भाजपविरोधात देशात सध्या विरोधी पक्षाची मोट बांधण्याचे मनसुबे त्यांनी बोलून दाखवले. मात्र या पत्रकार परिषदेला सुरूवात होतानाच संजय राऊत (Sanjay Raut) राव यांच्या कानात जे बोलले ते बरोबर माईकने पकडे आहे. त्यामुळे आता राऊत यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे. भेट कशाबाबत होती हे सांगत संजय राऊतांनी या पत्रकार परिषदेची सुरूवात केली. त्यानंतर ज्यावेळी राव यांच्याकडे बोलण्याची जबाबदारी सोपण्यात आली. त्यावेळी केसीआर बोलण्याची सुरूवात करण्याआगोदरच राव यांच्या कानाजवळ जात राऊत कुजबूज करताना दिसून आले. आणि कानात काय सांगितलं हेही माईकने पकडलं.
राऊतांनी काय कानमंत्र दिला?
राव बोलायला सुरू करायच्या आधी राऊत यांनी लगबगीने त्यांना कानात सांगितलं की फक्त तुम्ही बोल, नो क्वेशन अन्सरस, म्हणजे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देऊ नका. त्यानंतर राव यांनीही होकारार्थी मान हालवली आणि बोलण्यास सुरूवात केली. काही दिवसांपूर्वीही संजय राऊतांनी एक मोठी वादळी हायव्होल्टेज पत्रकार परिषद घेतली. यावेळी राऊतांचा फंडा नो क्वेशन, अन्सर हाच होता. त्यामुळे राऊतांना कसल्या प्रश्नांची भिती वाटतेय? अशा सवाल लोक विचारत आहेत. राऊतांच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंटचा पाऊस पाडला आहे, एका युजरने लिहले आहे की आरे बापरे, किंती भीती आहे पहा. प्रश्न उत्तरं नको म्हणत आहेत. दुसऱ्या बाजूला महोदय म्हणत आहेत की आमचं आत एक आणि बाहेर एक असं काही नाही. नक्की खरं काय ? जय महाराष्ट्र…..!! अशा अनेक कमेंट या व्हिडिओ वर आल्या आहेत.
राव-ठाकरे काय म्हणाले?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील राजकारण गढूळ बनत असल्याचं सांगत आज नवी सुरुवात आम्ही केल्याचं म्हणाले. तसंच याला आकार येण्यास काहीसा वेळ लागेल. पण प्रयत्न तर केले पाहिजेत, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे भाजपविरोधी आघाडी उभी करण्याचा इशारा देत भाजपला थेट आव्हान दिलंय.आम्ही दोघं भाऊ लागतो, कारण आमची हजार किलोमीटरची सीमा जोडली आहे. त्यामुळे एकत्र काम करावे लागते, पुढेही एकत्र काम करू. देशाच्या राजकारणातबाबत तर चर्चा होणारच होती. आज ज्या पद्धतीने देश चालला आहे, त्यात बदल झाला पाहिजे.देशात एका मोठ्या परिवर्तनाची गरज आहे. देशातल्या युवकांना देशातला महोल नाही खराब केला पाहिजे. अशी आमची अपेक्षा आहे. इतर पार्टीच्या लोकांशीही आम्ही एकत्र काम करण्याबाबत बोलणार आहोत. महाराष्ट्रातून निघालेला मोर्चा देशात क्रांती घडवतो. एक चांगली सुरूवात आम्ही इथून करत आहोत, असेही राव यांनी सांगितले. मात्र या भेटीनंतरही चर्चा फक्त राऊतांची आहे.