VIDEO | तपास यंत्रणांना महाराष्ट्रात टार्गेट, शरद पवारांसह महाविकास आघाडीचे नेते निशाण्यावर; राऊतांच्या दाव्याने खळबळ

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडलंय. यावेळी त्यांनी तपास यंत्रणांना महाराष्ट्र टार्गेट दिलं असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसह महाविकास आघाडीचे नेते तपास यंत्रणांच्या टार्गेटवर असल्याची खळबळजनक माहिती दिली. यामुळे बोलताना राऊतांनी भजापच्या विजयावरही सडकून टीका केलीय. तर पंतप्रधानांनाही त्यांनी लक्ष्य केलंय.

VIDEO | तपास यंत्रणांना महाराष्ट्रात टार्गेट, शरद पवारांसह महाविकास आघाडीचे नेते निशाण्यावर; राऊतांच्या दाव्याने खळबळ
शिवसेना नेते संजय राऊत Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 10:24 AM

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर (bjp) टीकास्त्र सोडलंय. यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या ईडी सत्रावर भाष्य करताना केंद्र सरकारला लक्ष्य केलं. तपास यंत्रणांना महाराष्ट्रात टार्गेट दिलं आहे, असं संजय राऊतांनी म्हणत तपास यंत्रणांवरच प्रश्न उपस्थित केलाय. तर याचवेळी राऊतांनी राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसह महाविकास आघाडीतील नेते तपास यंत्रणांच्या टार्गेटवर असल्याचा खळबळजनक दावाही पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, भाजपनं विजय मिळवलेल्या उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, उत्तराखंड या चार राज्यांतील विजयाचा उन्माद मांडून नये, असं सांगायलाही राऊत विसरले नाही. गोव्यात कोणताही पक्ष जिंकत नसतो. गोव्यात फक्त व्यक्ती जिंकते, असं म्हणत राऊतांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही (PM Narendra Modi) टीका केलीय.

तपास यंत्रणांवर राऊतांचं टीकास्त्र

राज्यातील महाविकास आघाडी आणि केंद्र सरकारमधील द्वंद सर्वश्रृत आहे. आता यावर रोज राजकीय आरोप प्रत्यारोप, टीका- टिप्पणी राजकीय नेते करत असतात. महाविकास आघाडीमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार भावना गवळी, प्रताप सरनाईक, आनंदराव अडसूळ यांच्यावर झालेली ईडी कारवाई असो वा राज्यातील ईडी सत्र, यावर बोलताना शिवसेना नेते संजय राऊतांनी एक महत्वाचं विधान केलंय. तपास यंत्रणांना टार्गेट दिलं जातंय, असा दावा संजय राऊतांनी यावेळी केलाय. तर तपास यंत्रणांच्या टार्गेटवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसह महाविकास आघाडीचे नेते असल्याचंही राऊत यावेळी म्हणालेत.

पंतप्रधानांवर राऊतांची टीका

शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही एका पक्षाचे पंतप्रधान नसून ते अवघ्या देशाचे पंतप्रधान आहे. मोदी हे एका पक्षाचे नेतृत्व करतायेत. ते देशाचे पंतप्रधान आहे, भाजपचे नाही, असा खोटक टोलाही संजय राऊतांनी पंतप्रधानांना यावेळी लगावलाय.

इतर बातम्या

गोवा भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; राणे, सावंत आमने-सामने

शेगावला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, कार-ट्रकच्या भीषण अपघातात पाच जण मृत्युमुखी

उद्यापासून दहावीची परीक्षा, 20 हजार 985 परीक्षा केंद्रांची व्यवस्था

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.