मुंबई: भाजपच्या (bjp) रंगात भेसळ आहे. ते भेसळीचे रंग वापरतात. त्यांच्या भेसळीच्या रंगांना आम्ही घाबरत नाही. त्यांचा रंग रेड असेल किंवा इतर काही असेल, होळी ही वर्षातून एकदा येते. पण यांचा शिमगा रोज सुरू आहे. आम्ही रोज शिमगा करायला सुरुवात केली तर महाराष्ट्रातही खूप खड्डे खोदलेले आहेत. त्यात कोण पडेल हे हळूहळू दिसेल, असा इशारा संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपला दिला आहे. शिवसेना (shivsena) हा मोठा पक्ष आहे. शिवसेनेचं आव्हान मोठं आहे. ज्यांचं आव्हान मोठं असतं त्याच्याविरोधात बोंब मारली जाते. ज्यांचं आव्हान नाही, ज्यांच्या दंडात ताकद नाही, त्यांच्याकडून ही बोंब मारली जाते. भाजपच्या दंडात ताकत आहे असं त्यांना वाटतं. पण ते समोरून वार करत नाहीत. पाठिमागून करतात. अडीच वर्ष झाले ठाकरे सरकारला. अजून अडीच वर्ष जातील. आम्ही पुन्हा पाच वर्ष सत्तेत राहू, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला. भाजपने शिमग्याचा अर्थ समजून घ्यावं. भाजपने. त्या पद्धतीने रंग उधळावे. महाराष्ट्राचा रंग स्वाभिमान, अखंडता आणि एकोप्याचा आहे. हे तुम्ही समजून घ्यावं. सध्या कशावरून काय होईल. त्याबद्दल न बोललेलं बरं. इतकं राजकारण बिघडवून ठेवलं आहे. महाराष्ट्रातील सुसंस्कृतपणा महाराष्ट्रातील राजकारणातील विनोद आणि संवेदनशील मन त्यांनी बिघडवून ठेवलं हे वातावरण कधीच नव्हतं. ते दुर्देवाने भाजपने केलं आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
भाजपला वाटत असेल केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जाईल. खोटे आरोप, चिखलफेक करून महाविकास आघाडीचे खासदार, आमदार आणि नेत्यांचं मनोबल खाली आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं आहे. आम्ही ते होऊ देणार नाही. आम्ही मजबूत आहोत. काल शरद पवार यांनी विश्वास दिलेला आहे. घाबरू नका. मी पुन्हा महाराष्ट्रात भाजपला येऊ देणार नाही. ही पवारांची भूमिका फक्त राष्ट्रवादीची नाही, ती महाविकास आघाडीच्या वतीने त्यांनी भूमिका मांडली आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी तरुण आमदारांसमोर भूमिका मांडली आहे. भाजपमधील आमचे मित्रं रोज तारखा देत आहेत. रोज रंग उधळत आहेत. ते नकली रंग आहेत. अशा नकली रंगांवर केंद्रीची बंदी आहे. काल त्यांना पवारांनी उत्तर दिलं आहे. काही झालं तरी महाराष्ट्रात भाजप येणार नाही, असं राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या:
Akola | वारंवार लैंगिक अत्याचार, अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्या कबड्डी प्रशिक्षकाला जन्मठेप
Maharashtra News Live Update : आम्ही शिमगा केला तर महाराष्ट्रात खड्डे खूप आहेत – संजय राऊत