संजय राऊत यांना मंत्र्याकडून जेलमध्ये टाकण्याचा इशारा? सीमावाद, राजकारण आणि कलगीतुरा

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई महाराष्ट्राला चिथावत असताना, मुख्यमंत्री शिंदे गप्प का? असा सवाल करत, राऊतांनी विषारी शब्दात टीका केली. पण त्यानंतर मंत्री शंभूराज देसाईंनी राऊतांना थेट जेलचाच इशारा दिला.

संजय राऊत यांना मंत्र्याकडून जेलमध्ये टाकण्याचा इशारा? सीमावाद, राजकारण आणि कलगीतुरा
Follow us
| Updated on: Dec 07, 2022 | 11:06 PM

मुंबई : सीमावादावरुन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची चिथावणी आणि कन्नडिगांचा हैदोसामुळं शिवसेना खासदार संजय राऊत सरकारला घेरतायत. राऊतांनी विखारी शब्दात टीका करण्यास सुरुवात केली. त्यामुळं आता मंत्री शंभूराज देसाईंनी राऊतांना थेट जेलचाच इशारा दिला. तर भाजपच्या बावनकुळेंनी राऊतांच्या पत्रकार परिषदाच बंद पाडू असं म्हटलंय. विशेष म्हणजे वाद तसा कर्नाटकशी सीमावादावरुन सुरु आहे. पण खटके खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्र सरकारमध्ये उडतायत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई महाराष्ट्राला चिथावत असताना, मुख्यमंत्री शिंदे गप्प का? असा सवाल करत, राऊतांनी विषारी शब्दात टीका केली. पण त्यानंतर मंत्री शंभूराज देसाईंनी राऊतांना थेट जेलचाच इशारा दिला.

त्यानंतर जेलचा इशारा म्हणजे धमकी समजायची का ? असा सवाल ट्विटमधूनही राऊतांनी शंभूराज देसाईंना केला. तर इकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही राऊतांचं बोलणंच बंद करण्याचा इशारा दिला. विखारी शब्द वापरले तर पत्रकार परिषद होऊ देणार नाही, असं बावनकुळे म्हणालेत.

मनी लाँड्रिंगच्या आरोपात, ईडीनं अटक केल्यानंतर राऊत 3 महिने जेलमध्ये होते. जामिनावर आर्थर रोड जेलमधून त्यांची सुटका झाली. जेलमधून बाहेर आल्यावरही राऊतांनी आपल्या धारदार शब्दानं, शिंदे-भाजपच्या मंत्र्यांना घायाळ करणं सुरुच ठेवलंय. त्यावरुन आता शिंदे गट असो की भाजपचे नेते राऊतांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देत आहेत.

हे सुद्धा वाचा

सीमावादावरुन कन्नडिगांनी उच्छाद मांडला. महाराष्ट्रातून बेळगावात जाणाऱ्या गाड्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्या. महाराष्ट्राच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यावरुन फडणवीसांनी अमित शाहांना सांगणार असल्याचं म्हटलं. पण मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया न आल्यानं, राऊतांनी शिंदेंना घेरलंय.

शिंदे स्वत:ला भाई म्हणवतात, मग कर्नाटकला भाईगिरी दाखवा असं आव्हान राऊतांनी दिलं. मंगळवारी बेळगावात कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी धुडघूस घातल्यानंतर पुन्हा डरपोक्ती सुरुच आहे. वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आता संजय राऊतांना आव्हान दिलंय. हिंमत असेल तर बेळगावात या, अशी चिथावणी वेदिकेचे कार्यकर्ते देतायत.

कन्नडिगांच्या अशा पोकळ धमक्यांना प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे. पण असं असताना राऊत आणि सरकारचे मंत्रीच आमनेसामने आलेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.