Breaking | संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीस यांना आणखी एक पत्र, म्हणाले सरकारात ‘हे’ बाजारबुणगे…. नेमका काय आरोप?

भाजप-शिंदे सरकारमधील तीन नेत्यांवर संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. याचे पुरावे देण्यासाठी मी आपणास भेटू इच्छितो, अशा आशयाचं पत्र संजय राऊत यांनी फडणवीस यांना लिहिलंय.

Breaking | संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीस यांना आणखी एक पत्र, म्हणाले सरकारात 'हे' बाजारबुणगे.... नेमका काय आरोप?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 9:25 AM

दिनेश दुखंडे, मुंबई : शिंदे-भाजप (Shinde BJP) सरकारवर आगपाखड करणाऱ्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना आणखी एक पत्र पाठवलंय. आपल्या सोबत सरकारमध्ये काही बाजारबुणगे आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे मी याआधीही दिले होते. आताही देतोय.. राज्यातला भ्रष्टातार मोडून काढावा, या लोकांवर कारवाई करावी, या भ्रष्टाचाराचे पुरावे देण्यासाठी मी आपणास भेटू इच्छितो अशी विनंती संजय राऊत यांनी या पत्रातून केली आहे. भाजप आमदार राहुल कुल, शिवसेना आमदार दादा भुसे तसेच किरीट सोमय्या यांच्याविरोधात संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी होणार, असा सवाल राऊत यांनी केलाय.

३ नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे

संजय राऊत यांनी याआधीही किरीट सोमय्या, राहुल कुल आणि दादा भूसे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ते आरोप पुढील प्रमाणे-

राहुल कुल- भाजप आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटी रुपयांचं मनी लाँडरींग झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. दौंड येथे हा कारखाना आहे.

दादा भुसे- नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील गिरणा अॅग्रो नावाने मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांकडून १७८ कोटींचे २५ लाख शेअर्स गोळा केले. या रकमेचा अपहार झाला असून कंपनीच्या वेबसाइटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स फक्त ४७ शेतकऱ्यांच्या नावावर दाखवल्याचा आरोप राऊत यांनी केलाय.

किरीट सोमय्या- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विक्रांत युद्ध नौका वाचवण्यासाठी जनतेकडून पैसे जमा केले. त्याचाही दिशेब दिलेला नाही. या गुन्ह्याची चौकशी थांबवून सोमय्या यांना क्लिन चिट दिली हे धक्कादायक आहे, असं राऊत यांनी पत्रात लिहिलंय.

‘लांड्या-लबाड्यांविरोधाक कारवाई हवी’

बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना मी सोडणार नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. पण आपण जे बोलत आहात तसे महाराष्ट्रात खरेच घडले आहे का, आपल्याच सरकारमधील अनेकांची बेकायदेशीर कृत्ये आणि लांड्या लबाच्यांबाबत कारवाई करण्यासाठी मी आपणास भेटू इच्छितो, अशा आशयाचं पत्र संजय राऊत यांनी १ एप्रिल रोजी फडणवीस यांना लिहिलं आहे. राऊत यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून यासंबंधीची माहिती दिली.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.