हसन मुश्रीफांवर ईडीची धाड, हसन मुश्रीफांना यापूर्वीच तुरुंगात टाकण्याची भाषा असं सांगत संजय राऊत यांचा रोख कुणावर?
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तेवर पहाटेच्या वेळी ईडीच्या पथकाने छापेमारी केली आहे, ज्यामध्ये कोल्हापूर आणि पुण्यात ही कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते तथा आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तेवर ईडीने छापेमारी केली आहे. विविध ठिकाणी त्यांच्या मालमत्तेवर ईडीच्या पथकाने हे छापे टाकले आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कागल मतदार संघासह कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहे. हसन मुश्रीफांवर होत असलेली कारवाई चुकीची असल्याचे समर्थक म्हणत आहे. त्यांच्या घराच्या बाहेर समर्थक जमायला सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे एका विचारधारेच्या विरुद्ध आहे. त्याच्यावर गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून धाडी पडत आहे. त्यामध्ये अनेकांना तुरुंगात टाकण्यात आले. ज्यामध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक आणि मी ही होती. हसन मुश्रीफांवर यांना तुरुंगात टाकण्याची भाषा भाजपच्या लोकांनी केली होती. अशीच भाषा काही वर्षांपूर्वी भावना गवळी, यशवंत जाधव यांच्यासह काही प्रमुख लोकांबाबत केली होती, मात्र नंतर सरकारमध्ये सामील झाल्यावर त्यांना दिलासा मिळतो. आणि जे लोक विरोधात आहे त्यांच्यावर अशा प्रकारे दबावाचे राजकारण केले जातं असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
मला माहिती आहे, हसन मुश्रीफ हे लढावय्ये नेते आहेत, संघर्ष करणारे नेते आहे, संकटाशी सामना करणारे नेते आहे, आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तेवर पहाटेच्या वेळी ईडीच्या पथकाने छापेमारी केली आहे, ज्यामध्ये कोल्हापूर आणि पुण्यात ही कारवाई करण्यात आली आहे.
काही वर्षांपूर्वी हसन मुश्रीफांना जेलमध्ये टाकले जाईल असा इशाराच भाजपच्या नेत्याने दिल्याचा संदर्भ राऊत यांनी दिला आहे.
हसन मुश्रीफांवर सुरू असलेल्या कारवाईवर संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहता हसन मुश्रीफ यांना अटक होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
संजय राऊत यांनी विरोधी पक्षात असलेल्या नेत्यांवर ही कारवाई भाजप करत असल्याचा रोख धरला होता, त्याचे संदर्भ देत राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.