Shinde Vs Raut:आता शिंदे विरुद्ध राऊत संघर्ष, ज्यांनी अडीच वर्षे सत्तेचा मलिदा लाटला, तेच आता बोलत आहेत, आक्षेप घेणाऱ्या शिवसेना नेत्यांना संजय राऊतांचे प्रत्युत्तर
एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्यातील वादामुळे, शिवसेनेतील नेत्यांमधील संघर्षही समोर आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला असलेल्या नेत्यांच्या दरबारी राजकारणात ग्रामीण भागातील आणि खऱ्या लोकनेत्यांना स्थान नसल्याची टीका यापूर्वीही वारंवार करण्यात येत होती. महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुढाकार घेतला होता. त्या वेळेपासूनच शिवसेनेतील अनेक आमदार त्यांच्यावर मनातून नाराज होते.
मुंबई – शिवसेना (Shivsena)आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्यातील संघर्ष आता तिखट प्रतिक्रियांच्या वळणांवर जात असल्याचे दिसते आहे. सूरतच्या हॉटेलमध्ये शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांच्याशी झालेल्या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत (Sanjay Raut)यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. राऊत आपल्याशी वेगळे बोलतात आणि माध्यमांशी वेगळे बोलत आहे, असा आक्षेप एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. भाजपाशी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती करुन सत्तेत यावे, अशी एक अट एकनाथ शिंदे यांनी घातली आहे. यानर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अडीच वर्षांनंतर अचानकपणे शिंदे यांची ही भूमिका समोर आलेली आहे. कोणताही पक्ष हा अटीवंर, शर्थीवर चालत नाही. काही विपरीत परिस्थितीत भाजपासोबत युती तोडण्यात आली, याचे एकनाथ शिंदेंही साक्षीदार आहेत. शिवसेनेचा अपमान वेळोवेळी करण्यात आलं, त्यातून युती तुटली हे सगळ्यांना माहित आहे, त्यावर काय बोलणार असे राऊत म्हणाले. आमच्याकडून शइंदेंशी संवादाचा प्रयत्न करण्यात येतो आहे. असे राऊत यांनी स्पष्ट केले
अडीच वर्ष सत्तेचा मलिदा ज्यांनी चाखला तेच आता बोलत आहेत
यानंतर संजय राऊत यांच्या दरबारी राजकारणावर अनेकांचा आक्षेप आहे, असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर ज्यांनी अडीच वर्षे सत्तेचा मलिदा चाखला, तेच आता माझ्यावर टीका करीत आहेत. असे राऊत म्हणाले आहेत.
कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी
या सगळ्या वादात आता कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेसोबत सध्या ३१ आमदार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. एकनाथ शिंदे हे आमचे सहकारी आहेत, हेही संजय राऊत सातत्याने सांगत आहेत.
शिवसेनेतील संघर्ष समोर
एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्यातील वादामुळे, शिवसेनेतील नेत्यांमधील संघर्षही समोर आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला असलेल्या नेत्यांच्या दरबारी राजकारणात ग्रामीण भागातील आणि खऱ्या लोकनेत्यांना स्थान नसल्याची टीका यापूर्वीही वारंवार करण्यात येत होती. महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुढाकार घेतला होता. त्या वेळेपासूनच शिवसेनेतील अनेक आमदार त्यांच्यावर मनातून नाराज होते. आता एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पहिल्यांदाच हा वाद प्रामुख्याने समोर आला आहे.