अजितदादा भाजपात आले तर शिंदेचं बळ कमी होणार? संजय शिरसाट यांनी शिंदे गटाची भूमिका सांगितली
मुंबई : शिवसेनेतून बंड केलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे आमदार भाजपसोबत सत्तेत बसले खरे. पण आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसदेखील सत्तेत शामिल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात या पार्श्वभूमीवर वेगाने घडामोडी सुरु आहेत. कोणत्याही क्षणी अजित पवार त्यांची भूमिका स्पष्ट करतील. मुंबईत सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वाची बैठक घेत […]
मुंबई : शिवसेनेतून बंड केलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे आमदार भाजपसोबत सत्तेत बसले खरे. पण आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसदेखील सत्तेत शामिल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात या पार्श्वभूमीवर वेगाने घडामोडी सुरु आहेत. कोणत्याही क्षणी अजित पवार त्यांची भूमिका स्पष्ट करतील. मुंबईत सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वाची बैठक घेत आहेत. पण अजित पवार हे सत्तेत शामिल झाले तर एकनाथ शिंदे गटाचं वजन कमी होणार का, अशा चर्चा सुरु झाल्यात. यावर आमदार संजय शिरसाट यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले शिरसाट?
अजित पवार भाजपसोबत शामिल झाले तर शिंदे गटावर काहीही परिणाम होणार नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. ते म्हणाले, सुप्रीम कोर्टात जरी आमच्या प्रकरण असेल तरी आम्हाला पूर्ण विश्वास आहे की त्या ठिकाणी आमचाच विजय होणार आहे. आमच्या अस्तित्वाला कुठलाही धक्का पोहोचणार नाही. कुठलेही गालबोट लागणार नाहीये. उलट महायुती मजबूत होईल. पुढे भविष्यात निवडणुका होणारेत, त्या निवडणुकांवर याचा परिणाम होईल आणि जास्त जागा त्या ठिकाणी आम्ही जिंकू, असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला.
दादांनी हिंदुत्वाचा विचार आणावा…
अजितदादांच्या ज्या काही बातम्या येत आहेत त्यामध्ये जर तथ्य असेल तर ही आमच्यासाठी फार मोठी बाब आहे. दादा हे येत असतील तर हिंदुत्वाचा विचार घेऊन त्यांनी यावा, असा आमचं म्हणणं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच राहतील हे देखील तितका सत्य आहे, असंही शिरसाट यांनी म्हटलं.
ठाकरेंची दिशा भरकटलेली…
महाविकास आघाडीची ताकद यामुळे क्षीण होईल. आधीच उद्धव ठाकरे यांची दिशा भरकटलेली आहे. त्यात आता या बंडामुळे त्यांना दिशाच उरणार नाही. त्यामुळेच संजय राऊत हे आजच्या पत्रकार परिषदेत गोंधळलेल्या अवस्थेत होते, असं वक्तव्य शिरसाट यांनी केलंय.
नागपूरच्या सभेत अजित पवारांना बोलू दिलं नाही. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व अजित पवार यांना मान्य नाही, असं वक्तव्य शिरसाट यांनी केलंय.
सुप्रीम कोर्टाचा निकाल लागू द्या. प्रकाश आंबेडकर दोन भूकंप करणार आणि तिसरा मोठा भूकंप करू, असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय.