कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजारांचे अनुदान; नाशिकरांनी येथे साधावा संपर्क
नाशिक जिल्ह्यात कोरोना आजाराने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजारांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. त्यासाठीची कार्यपद्धती लवरच जाहीर केली जाणार आहे.
नाशिकः नाशिक जिल्ह्यात कोरोना आजाराने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजारांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. त्यासाठीची कार्यपद्धती लवरच जाहीर केली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केले आहे. त्याअनुषंगाने ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती शासनाकडून लवकरच अधिसूचित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष सूरज मांढरे यांनी कळविले आहे.
आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव यांच्या 12 ऑक्टोबर 2021 रोजीच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्यातील कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रुपये 50 हजार सानुग्रह अनुदान वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाचा पत्ता : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, नाशिक जिल्हा नियंत्रण कक्ष (आपत्ती व्यवस्थापन प्रभाग), जुना आग्रारोड, नाशिक-1, 0253-2315080 व 2317151 तसेच टोल फ्री क्रमांक 1077 येथे संपर्क साधावा. त्याचप्रमाणे www.nashik.gov.in या संकेतस्थळावर आणि ddmanashik@gmail.com या ई मेलवर अधिक माहितीसाठी संपर्क साधण्यात यावा, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आवाहन केले आहे.
खासगी संस्थाना कागदपत्रे देवू नका मदत व पुनर्वसन विभागाकडून सानुग्रह अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कार्यपद्धतीबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. तसेच सानुग्रह अनुदानाबाबत कोणत्याही खासगी व्यक्ति किंवा संस्था यांना कागदपत्रे देवू नये, याबाबत पैशांची मागणी झाल्यास वरील नमूद पत्त्यावर तक्रार करण्याचे आवाहन देखील जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
पुन्हा वाढतायत रुग्ण
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज शनिवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत 734 रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यात निफाड 123,सिन्नरमधील 129, येवला येथील 62 जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यात आणि विभागात विक्रमी लसीकरण होऊनही निफाड, येवला आणि सिन्नर तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतानाच दिसतायत. नगर जिल्ह्याचा सिन्नर तालुक्याशी संबंध येतो. नगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे नुकतेच अनेक गावांमध्ये लॉकडाऊन करावे लागले होते. त्याचाच संसर्ग नाशिक जिल्ह्यातल्या या तालुक्यांमध्ये होत असल्याची शंका आहे. हे पाहता लसीकरणाला अजून वेग द्यावा. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रुपये 50 हजार सानुग्रह अनुदान वितरित करण्यात येणार आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडून सानुग्रह अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कार्यपद्धतीबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक
इतर बातम्याः
नाशिक महापौर पदाचा उमेदवार कोण, आमदार कांदेंना महाराष्ट्राबाहेरून धमक्या, राऊतांचे दिवाळीआधीच फटाके!
सोमय्या म्हणाले, राऊत कुणाचे प्रवक्ते, पवारांचे की ठाकरेंचे? आता राऊत म्हणाले, हा तर मोदींचा अपमान
नाशिक महापौर पदाचा उमेदवार कोण, आमदार कांदेंना महाराष्ट्राबाहेरून धमक्या, राऊतांचे दिवाळीआधीच फटाके!https://t.co/VZeIHvzGRm#NashikMunicipalElection |#ShivSena |#SanjayRaut
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 23, 2021