सरपंच महिलेची राजकारणातून न्यायव्यवस्थेत झेप, आता होणार न्यायाधीश
राजकारणातून न्यायव्यवस्थेकडे जाणाचा पराक्रम ॲड. मोहिनी बापूराव भागवत (शेलार) यांनी केला आहे. सरपंच असलेल्या मोहिनी आता प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत त्यांची निवड झाली आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यातून एक सुखद बातमी आली आहे.एकेकाळी राजकारण गाजवणारी महिलेने मोठे यश मिळवले आहे. लोकशाहीच्या एका स्तंभातून दुसऱ्या स्तंभाकडे त्यांनी वाटचाल केली आहे. म्हणजेच राजकारणातून न्यायव्यवस्थेकडे जाणाचा पराक्रम ॲड. मोहिनी बापूराव भागवत (शेलार) यांनी केला आहे. सरपंच असलेल्या मोहिनी आता प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत त्यांची निवड झाली आहे. सरपंचापासून न्यायाधीश होणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या महिला आहे.
दौंड तालुक्यातील मळद गावच्या रहिवासी असलेल्या ॲड. मोहिनी बापूराव भागवत (शेलार) या सरपंच आहेत. त्यांची प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारीपदी निवड झाली आहे. एमपीएससीने न्यायाधीश पदासाठी घेतलेल्या परीक्षेत त्या राज्यातून पाचव्या आल्या आहे. रपंच ते न्यायाधीश अशी वाटचाल करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहे.
शेतकरी कुटुंबात जन्म ; ॲड. मोहिनी यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी शेतकरी कुटुंबातून शिक्षण विधी शाखेची पदवी घेतली. त्यांचा विवाह ॲड. बापूराव भागवत यांचीशी झाला. बापूराव यांनीही मोहिनी या नेहमी प्रोत्साहित केले. त्यामुळे एमपीएससीचा अभ्यास त्यांनी सुरु केला. आता या परीक्षेत यश मिळवले. ॲड बापूराव भागवत यांचे पती हे दौंड तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. मोहिनी यांच्या यशस्वी वाटचालीचे परिसरातून स्वागत होत आहे.