Satara Accident : कोरेगावमध्ये इर्टिका पलटी, तिघांचा मृत्यू, पाहा व्हीडिओ…
Car Accident : साताऱ्यात भीषण अपघात
सातारा : साताऱ्यात भीषण अपघात (Satara Accident) झाला आहे. कार अॅक्सिडेंटमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील सुर्ली येथे काल रात्री 11 वाजता इर्टिका गाडी पलटी (Ertiga Car Accident) झाली. या भीषण अपघातात आर्वी येथील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. आर्वी येथील तुकाराम आबाजी माने (वय 65 ),तानाजी आनंद माने (वय 62) सुभाष गणपत माने (वय 60 )या तिघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. हे तिघे साताऱ्याहून आर्वीकडे जात होते. सुर्ली गावानजीक आल्यावर ही घटना घडली. सुर्ली गावा नजीकच्या वळणावर चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला. ही गाडी पलटी झाली. या भीषण अपघातामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले.मात्र या तिघांना वाठार किरोली येथील दवाखान्यात नेण्यात आलं. सातारा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टरांनी या तिघांनी मृत घोषित केलं.
साताऱ्यात भीषण अपघात
सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील सुर्ली येथे काल रात्री 11 वाजता इर्टिका गाडी पलटी झाली. या भीषण अपघातात आर्वी येथील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. आर्वी येथील तुकाराम आबाजी माने (वय 65 ),तानाजी आनंद माने (वय 62) सुभाष गणपत माने (वय 60 )या तिघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
साताऱ्यातील कोरेगावमध्ये भीषण अपघात… pic.twitter.com/ilSbmgOt57
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 1, 2022
अपघात कसा झाला?
साताऱ्याहून आर्वीकडे जात होते. सुर्ली गावानजीक आल्यावर ही घटना घडली. सुर्ली गावा नजीकच्या वळणावर चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला. ही गाडी पलटी झाली. या भीषण अपघातामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले.
तिघांचा मृत्यू
अपघातात जखमी झालेल्या तिघांना वाठार किरोली येथील दवाखान्यात नेण्यात आलं. सातारा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टरांनी या तिघांनी मृत घोषित केलं.