Satara Corona Update : सातारा जिल्ह्यात 15 ऑगस्टपासून निर्बंध शिथिल, काय सुरु, काय बंद राहणार?
राज्य सरकारनं 15 ऑगस्टपासून मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सातारा जिल्हाधिकाऱ्यांनीही कोरोना निर्बंधांबाबत नवे आदेश काढले आहेत. त्यानुसार सातारा जिल्हा प्रशासनानं घातलेले कोरोना निर्बंध 15 ऑगस्टपासून शिथिल होणार आहेत.
सातारा : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताना दिसत आहे. दुसरीकडे राज्यभरातील नागरिकांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून कोरोना निर्बंध हटवण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं 15 ऑगस्टपासून मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सातारा जिल्हाधिकाऱ्यांनीही कोरोना निर्बंधांबाबत नवे आदेश काढले आहेत. त्यानुसार सातारा जिल्हा प्रशासनानं घातलेले कोरोना निर्बंध 15 ऑगस्टपासून शिथिल होणार आहेत. (Relaxation in corona restrictions from August 15 in Satara district, Satara District Collector’s order)
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आता जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकानं, उपहारगृह नियम व अटींसह रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर मंगल कार्यालयातील विवाह सोहळ्यांसाठी 10 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सिनेमागृह आणि धार्मिक स्थळं पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. तसे आदेश सिंह यांनी आज काढले आहेत.
कोरोना निर्बंधांबाबत राज्य सरकारचे महत्वाचे निर्णय?
>> 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाला मुभा. मात्र त्यासाठी कोरोना लसीचे दोन डोस आणि दुसऱ्या डोसनंतर 14 दिवस होणं गरजेचं आहे. याचा पुरावा दाखवल्यावर प्रवाशांना लोकलचे पास दिले जातील. तसंच बेकायदेशीररित्या प्रवास केल्यास 500 रुपये दंडासह उचित कारवाई केली जाणार आहे.
>> हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना 50 टक्के मर्यादेनं रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, वेटिंगला थांबलेले ग्राहक, वेटर, हॉटेल चालक यांनी मास्क घालणं बंधनकारक असणार आहे.
>> विवाह सोहळ्यांबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खुल्या प्रांगणात होणाऱ्या विवाह सोहळ्यांसाठी 200 लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. तर मंगल कार्यालयात होणाऱ्या विवाह सोहळ्यांसाठी आसन क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेनं परवानगी देण्यात आली आहे.
>> सर्व शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांना तातडीने लस देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
>> खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं असेल तर 100 टक्के उपस्थितीनं काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर खासगी कार्यालयांना 24 तास चालू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, एका सत्रात 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी असेल.
>> सर्व दुकानांना रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
>> सिनेमागृह , नाट्यगृह , धार्मिक स्थळे मात्र पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत.
>> इनडोअर स्पोर्टस सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, खेळाडू आणि चालकांसह सर्वांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं अनिवार्य आहे.
इतर बातम्या :
मलिक म्हणतात, राज्यपाल अधिकाराचा गैरवापर करत आहेत, तर दरेकर म्हणतात, राज्यपालांवर दबाव नको!
Relaxation in corona restrictions from August 15 in Satara district, Satara District Collector’s order