Satara Rain | साताऱ्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, महाबळेश्वरमध्ये विक्रमी पावसाची नोंद, कोणत्या धरणातून किती पाण्याचा विसर्ग?

महाबळेश्वर तालुक्यात 28 पेक्षा अधिक गावांमध्ये दरड, झाडे, खांब पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Satara Rain | साताऱ्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, महाबळेश्वरमध्ये विक्रमी पावसाची नोंद, कोणत्या धरणातून किती पाण्याचा विसर्ग?
satara rain
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 8:06 AM

सातारा : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून अनेक भागात ढगफुटीसदृश पाऊस कोसळत आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड भागात मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. (Satara Heavy Rain in many area record rainfall in Mahabaleshwar Dam Water Discharge Update)

महाबळेश्वरमध्ये गेल्या 24 तासात विक्रमी पावसाची नोंद

जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच साताऱ्यातील पश्चिम भागात मोठा पाऊस पाहायला मिळत आहे. त्यामुळे जवळपास 75 पेक्षा अधिक गावाचा संपर्क तुटला आहे. महाबळेश्वरच्या इतिहासात प्रथमच गेल्या 24 तासात 594 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे धावरी गावातील दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यात अंकुश मारुती सपकाळ या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर महाबळेश्वर तालुक्यात 28 पेक्षा अधिक गावांमध्ये दरड, झाडे, खांब पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

साताऱ्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर कायम 

तर दुसरीकडे साताऱ्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. साताऱ्यात कोयना धरण परिसरात आतापर्यंत 2597 मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर नवजाला 3427 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्याशिवाय महाबळेश्वरमध्ये 3209 मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

साताऱ्यात कोणत्या धरणातून किती पाण्याचा विसर्ग? 

?कोयना धरणातून 54541 क्यूसेसने विसर्ग ?धोम प्रकल्पातून 8711 क्यूसेसने विसर्ग ?कणेर प्रकल्पातून 7219 क्यूसेसने विसर्ग ?उरमोडी प्रकल्पातून 5 हजार 934 क्यूसेसने विसर्ग ?तारळी धरणातून 12 हजार 255 क्यूसेसने विसर्ग ?बलकवडी प्रकल्पातून 4 हजार 619 क्यूसेसने विसर्ग

(Satara Heavy Rain in many area record rainfall in Mahabaleshwar Dam Water Discharge Update)

संबंधित बातम्या : 

VIDEO: काल इथे गाव होतं… डोंगराच्या आडोशाला गेले आणि…; तळीयेची दुर्घटना नेमकी कशी घडली?; वाचा सविस्तर

Weather update today : कोकणावर संकट कायम, पुढचे 3 दिवस धोक्याचे, IMD च्या अंदाजाने धाकधूक कायम

Satara Landslide: साताऱ्यात आंबेघर गावात दरड कोसळली, 12 जणांचा मृत्यू

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.